"अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, ला इलाहा इल्लल्ला..."
घराशेजारच्या मशिदीच्या खरखरत्या लाऊडस्पीकरमधून काझीसाहेबांचा आवाज आला आणि गाढ झोपलेला उस्मान एकदम गडबडून जागा झाला. अर्धवट झोपेतच त्याने बाहेर नजर टाकली, त्याला पटकन आपण कुठे आहोत हेच समजेना. बाहेर अजून अंधार होता, रात्र सरल्यासारखी वाटत नव्हती. काझीसाहेबांचं दुसरं आवर्तन सुरू झालं आणि मात्र त्याला हळूहळू भान यायला लागलं. आपण तर आपल्याच घरात आहोत की चक्क...
तो पर्यंत काझीसाहेबांची अझान संपली होती आणि लाऊडस्पीकर नुसताच जोरात खरखरत होता. उस्मानला म्हातार्याच्या युक्तीचं नेहमीच हसू यायचं. हा काझीसाहेब मोठा वस्ताद आहे. अझान झाली तरी तो जुनाट खरखर करणारा लाऊडस्पीकर चांगली पाचएक मिनिटे चालूच ठेवतात ते. सहसा अझान संपली की परत पांघरूणात गुडुप्प होतात लोक. इतक्या थंडीचं सकाळी सकाळी फजरेच्या नमाजाला उठायचा बरेच लोक कंटाळा करायचे. फारतर घरातच नमाज अदा करायचे. पण लाऊडस्पीकरच्या खरखरीने त्यातल्या बहुतेकांची झोप पार मोडायची आणि आता उठलोच आहोत तर जाऊन येऊ म्हणून ते मशिदीत दाखल व्हायचे.
इतक्या वर्षांच्या सवयीने उस्मान बरोब्बर अझान व्हायच्या आधीच जागा झालेला असायचा. पहाटेच्या शांत वातावरणात अझान ऐकताना तो अगदी तल्लीन व्हायचा. काझीसाहेबांचा आवजही गोड आणि सुरेल अगदी. रात्री इशाची शेवटची नमाज झाली की घरी भाकरतुकडा खाऊन म्हातारा मारूतिच्या देवळात भजनपार्टीला साथ करायला हजर. अझान झाली की मग उस्मान सावकाश उठून वझू करून निवांत चालत गल्लीच्या टोकाला असलेल्या मशिदीत दाखल व्हायचा. पण आज अझान होऊन गेली आणि आता काझीसाहेब नमाज सुरू करतील हे समजत असून सुध्दा त्याच्याने अगदी उठवत नव्हतं. रात्री उशिरा पर्यंत खूप वर्षांनी गावात परत आलेल्या नईमबरोबर आणि जुन्या दोसदारांबरोबर गप्पांचा फड जमवून तो घरी आला होता, जमिनीला पाठ लावून कुठे दोन तीन घंटे होतात न होतात तर अझान झाली. उठायचं जीवावर आलं होतं पण काझीसाहेबांचा आवाज आला परत आणि तो सवयीने उठलाच एकदम. त्याच्या हालचालीने रशिदाही जागी झालीच होती जवळजवळ. रात्री त्याच्या पोटावर येऊन झोपलेल्या चांदसाहेबला त्याने हळूच बाजूला केले आणि गडबडीने वझू करून तो पळतच मशिदीत गेला. नमाज सुरू झालीच होती. काझीसाहेबांनी निवांतपणे आटोपलं. नमाज झाल्यावर अजून दोन-चार जणांशी दुवा सलाम करून उस्मान घरी परत आला.
जवळ जवळ उजाडलंच होतं. नदीवरल्या देवळातली घंटा वाजायला लागली होती. उस्मानने त्या दिशेने हात जोडले आणि तो घरात शिरला. अंगणातल्या मोरीवर त्याने परत हातपाय धुतले, पावडरने दात घासले आणि मागच्या अंगणात गेला.
"मै बोली आज नमाजकू जात नै जाते, क्या की. कित्ती देर तक सोये..." रशिदा अंगण झाडता झाडता म्हणाली.
"हाव ना बेगम. नींद खुली मगर उठने का मनच नै करा."
"फिर!!! कैसे करेगा? रातकू कितना लेट आये तुम. चार दोस्ता मिले तो दुनिया भूलते तुम. चांदसाहेब भोत देर तक बैठा था खिडकीमे... अब्बू, अब्बी आते, कब्बी आते. उदरीच सोया बैठे बैठे."
उस्मान तिथेच पायरीवर टेकला. पहाटेचं मस्त वारं सुटलं होतं. ना धड अंधार ना धड उजेड. उस्मानला एकदम मस्त वाटायला लागलं.
"बेगम, आव ना. बैठो इदर." तो लाडात येत रशिदाला म्हणाला.
"तर क्या. बस इतनाच बाकी है अब. पूरी रात दोस्तोके साथ उडाओ और दिनमे बेगम को गोद मे बिठाओ." रशिदा लटक्या रागाने म्हणाली. पण तिलाही उस्मानचा प्रसन्न चेहरा बघून बरं वाटलं. ती बसलीच येऊन त्याच्या जवळ.
"अरे बेगम, तो काल नईम आला ना, दुबईवरून. किती दिवसांनी आला तो. जवळजवळ चार वर्षांनी. मग बसलो गप्पा मारत. सांगत होता तिकडच्या गंमती."
"दिसला होता मला तो काल गल्लीत. सलाम करून गेला. किती बदललाय तो. कपडे काय, सेंट काय, काळा चष्मा... एकदम सामने आके क्या भाभीजान बोला. मै तो पैचानीच नै उसकू. फिर बोला मै नईम."
"अरे हे तर काहीच नाही. त्याच्या अब्बासाठी, अम्मीसाठी काय काय आणलंय त्याने. आणि काजू बदाम खजूर तर विचारूच नको. पूरी गल्लीमे बाटेगा करके बोल रहा था."
बराच वेळ दोघं बोलत बसले होते. रशिदाला मात्र राहून राहून मियाचं लक्षण ठीक वाटत नव्हतं. ती उस्मानला चांगलं ओळखत होती. त्याच्या चेहर्यावर त्याचं मन तिला स्वच्छ वाचता येत असे. आजपण त्याचं काहीतरी बिनसलं आहे हे तिला कळत होतं. पण शक्यतो तो स्वत:हून बोलेपर्यंत ती त्याला छेडत नसे. आजही तसंच काहीसं तिला जाणवत होतं. तेवढ्यात उस्मानचं लक्ष घड्याळाकडे गेलं. तालमीला जायला उशीर झाला होता गप्पांच्या नादात. घाईघाईत तो परसदारी जाऊन आला आणि तालमीकडे निघाला.
उस्मान मुकादम हे पंचक्रोशीतल्या पैलवान मंडळीत फार मोठं नाव होतं. वयाच्या दहाव्या वर्षी कल्लाप्पा वस्तादाचा गंडा बांधला होता त्याच्या बापाने त्याला. पंधराव्या वर्षी वस्तादाने त्याला धायगावच्या जत्रेत पहिल्यांदा मैदानात उतरवला होता. तेव्हा पासून खुब्याचं हाड निखळल्यामुळे कुस्ती सोडे पर्यंत आस्मान कसे दिसते हे उस्मानला माहित नव्हते. कायम तालमीत पडलेला असायचा. खरंतर जेमतेम पाच सहा हजार वस्तीचं गाव त्याचं. त्यात परत मुसलमानाची दहा वीसच घरं. एवढ्याश्या गावातून आलेला उस्मान पार जिल्ह्यापर्यंत मजल मारून आला. महाराष्ट्र केसरीची तयारी करताना त्याचा तोल जाऊन तो नेमका पडला आणि पडता पडता उजवा हात आधाराला म्हणून खांबाला धरला तर पूर्ण वजन येऊन खुबाच निखळला. तेव्हापासून कुस्ती बंद झाली. उस्मान खूप हळहळला. पण अल्लाची मर्जी म्हणून गप्प बसला. पण लायकी असूनही आपण शोहरत मिळवू शकलो नाही याचे दु:ख त्याच्या मनातून कधीच गेले नाही. बापाबरोबर धंद्याला लागला. बापाने हळूहळू दुकान त्याच्यावर टाकायला सुरूवात केली. एके दिवशी शेजारच्या गावातल्या रशिदाचा रिश्ता सांगून आला. बापाने रिश्ता पसंत केला म्हणून निमूटपणे लग्न केले. पण त्याच्या नशिबाने रशिदा खूपच चांगली निघाली. उस्मान तसा थोडा गरम डोक्याचा, पण रशिदा मात्र प्रत्येक गोष्ट नीट विचार करणारी. सासू सासर्याला खूष केलं तिने. वर्षाच्या आत पाळणा हलला आणि चांदसाहेब घरात आला. एक दिवस अचानक अम्मी हार्ट अॅटॅकने गेली आणि तिच्या दु:खात अब्बाही निघून गेले. आता उस्मान, रशिदाबेगम आणि चांदसाहेब एवढेच राहिले. धंदा असला तरी मिळकत फार नव्हती. दोन वेळचं खाऊन सुखी होते.
कुस्ती संपली पण पैलवानकी संपली नाही. रोज नियमाने मेहनत केल्याशिवाय उस्मानला चैनच पडत नसे. आणि तालमीतल्या नवीन पोरांना मातीत घोळवायचा जिम्मा त्याच्याकडेच दिला होता वस्तादानं. उस्मान तालमीत शिरला. कापडं काढली, मारूतीच्या समोर जाऊन नमस्कार केला आणि जय बजरंग म्हणून आखाड्यात उतरला. पण आज काय त्याचं मनच लागंना. तेवढ्यात एक दोन पोरांनी त्याला विचारलं पण, "काय झालं वस्ताद? आज आंगात जोर नाही जनू." भानावर येत तो परत समोरच्या पोराला भिडला. पण जरा वेळानं त्याचं त्यालाच गोड वाटेना. तो हौद्यातून बाहेर आला आणि कापडं करून निघाला. नदीवर जाऊन आंघोळ आटपून घरी आला. येऊन निवांत बसला तो अंगणातल्या खुर्चीवर. रोजच्यासारखं रशिदा दूधाचा लोटा त्याच्यासमोर ठेवून घरात गेली. जरा वेळानं बाहेर येऊन बघते तर लोटा तसाच आणि उस्मान शून्यात नजर लावून बसलेला. मग मात्र तिला राहवलं नाही.
"क्या सोचते जी? फजरसे देखी मै. क्या तो बी सोच रहे तुम."
"नाही, काही नाही." उस्मान भानावर येत म्हणाला.
"नाही कसं? मेरेसे नै छुपा सकते तुम जी. बोला ना... काय झालं?"
उस्मान घुटमळला. उगाच एक दोन वेळा त्यानं घसा खाकरल्यासारखं केलं, बोलू की नको, कसं बोलावं... रशिदाला कळेचना. असं काय आहे याच्या मनात?
"रहेनदो, मेरेकू कामा है... आप सोचते बैठो." तिने अर्धवट उठल्यासारखे केले. तिची युक्ती बरोब्बर लागू पडली आणि एकदम पूर्ण धीर एकवटून उस्मान तटकन बोलला...
"मी काय म्हणतोय बेगम... नईमशी बोलून कुठे दुबईत नोकरी मिळते आहे का बघू का?"
"हाय अल्ला!!! तर सकाळपासून हे चाललंय वाटतं हुजूरच्या डोक्यात. काही गरज नाही. खाऊन पिऊन सुखी आहोत आपण. आप कमा रहे ना? दो वखत का खाना नसीब हो रहा ना? मै पूछती क्या करना दुबई हमको?" रशिदा उसळून म्हणाली.
उस्मानला अंदाज होताच, रशिदा काय बोलणार याचा. तिला कसे पटवावे याचा विचार खरंतर तो करत होता. नईमशी बोलायचे त्याने मनात पक्के केलेच होते.
"ऐसा देखो बेगम, तुम ठीक बोली." तो तिच्या कलाकलाने घेत म्हणाला. "दो वखत की रोटी तो हो रही नसीब, पण जरा पुढचा विचार कर. दुकान कसे चालले आहे ते तुला माहितच आहे. काही खास नाही. अल्लाने एवढा सोन्यासारखा पोरगा आपल्याला दिला आहे. त्याच्या परवरिशची काही सोय नको का? मी २-३ वर्षांसाठी जाऊन येतो. बक्कळ पैसा मिळेल. मग आहोतच आपण इथे. चांदसाहेब खूप हुशार आहे. परवाच मास्तर आले होते दुकानात ते सांगत होते. क्या पता? कल को अच्छा पढेगा डाक्टर बनेगा तो पैसा तो लगेगा ना? मग काय करणार आपण?"
उस्मानला माहित होते, चांदसाहेब हा रशिदाचा अगदी सगळ्यात नाजूक कोपरा मनातला. एरवी कोणत्याही गोष्टीचा नीट विचार करणारी रशिदा याबाबतीत मात्र कमजोर पडते. त्याने बरोब्बर तिथेच नेम धरला. पण हा विषयच एवढा विचित्र होता की रशिदाच्या मनाची थोडी चलबिचल झाली तरी ती काही बधली नाही. तिचा हेका चालूच होता.
"हे बघ बेगम, आपण काही पैसेवाले नाही. एका पोराची परवरिश करायची आहे आपल्याला. पण मी तिकडे गेलो तर पैसाही मिळेल आणि आयुष्यात एकदा तरी मक्का मदिना बघायची इच्छा आहे माझी ती पण मला पूर्ण करता येईल. पैगंबरसाहब जहाँ चले सो वो मिट्टी कितनी पाक होगी? मेरेकू एक बार जरूर होना. तुम सबकू भी एक बार घुमाउंगा. बेगम ऐसा मौका बारबार नही आता."
"पण लोक तिथे जातात, तिथे फसवतात, वाट्टेल ते घडतं. माझ्या मयक्याला एक बाई आहे, तिचा शोहर तर १० वर्षं झाली अजून एकदाही आला नाही. पत्र येतं, पैसे येतात पण ते काय खाक खुषी देतात? मला भिती वाटते. आणि मिट्टी वगैरे सगळं ठीक आहे, पण त्या मिट्टीच्या नादाला लागून आपली मिट्टी नको व्हायला."
"काय बोलते तू बेगम? नईम माझा चांगला मित्र आहे. तो मला असं फसवणार नाही. मै अपनी जानकाभी भरोसा उसपे कर सकता हूं. मी एक काम करतो. आधी त्याच्याशी बोलून तर बघतो. आणि मग आपण ठरवू. आधीच कशाला नाही म्हणतेस." तो अगदी निकराने म्हणाला. रशिदालाही थोडी लालूच, थोडी उस्मानच्या हट्टीपणाची भिती वाटायला लागली होती. त्याने अगदी डोक्यात घट्ट धरलंच आहे हे जाणवलं तिला. त्याला जास्त विरोध केला तर तो अजून अडून बसेल हे तिला माहित होतं. परत चांदसाहेबच्या परवरिशची फिकीर होतीच तिलाही. अगदी काही घराला सोन्याची कौलं लागलेली नव्हती. तिचा विरोध लटका पडत गेला. उस्मानच्या चेहर्यावर तजेला आला. तो नाश्ता करायला बसला.
"अब्बा..." चांदसाहेबाची सकाळ झाली होती. स्वारी उठून धावत धावत उस्मानपाशी येऊन घट्ट बिलगली. "अब्बा, कुठे गेला होता? मी कित्ती कित्ती वाट बघितली रात्री?"
"मियाँ, मी काय पळून गेलो होतो का? इथेच तर होतो गल्लीमधे. तो नईमचाचा आलाय ना? त्याच्या बरोबर गप्पा मारत होतो. त्याच्या घरी." उस्मान चांदसाहेबला जवळ घेत म्हणाला. बापलेक बराच वेळ गप्पा मारत मस्ती करत बसले. रशिदा काम करता करता तृप्त होऊन त्यांच्या खेळाकडे बघत होती. मधेच तिचे डोळे भरून आले. तिने मनोमन दुवा मागितली, "या अल्लाह, या नबी, आमच्यावर लक्ष ठेव. नेकी असू दे, हरामाचा पैसा नको, बरकत दे."
उस्मान दुकानात जायला निघाला. जाताजाता तो नईमच्या घरी डोकावला. आज बोलून टाकायचंच. चांगल्या कामात देरी नको. बघू नशिब कसं आहे. नईम बाहेरच बसला होता. नुकताच उठलेला दिसत होता. आळसावून बसला होता.
"सलाम आलेकुम, नईममियाँ"
"आव आव, उस्मानसेठ. अम्मी दो कप चाय भेजना. उस्मानमियाँ आये है."
"क्या नईंम? सुब्बे सुब्बे मजाक नक्को करू भाई. कसला उस्मानसेठ आणि कसलं काय?"
"काय झालं उस्मान? कुछ गडबड? कल तक तो सब ठीक था ना भाई!!! "
"गडबड नाही नईम. पण तुझ्याशी एक बोलायचं होतं."
"अरे बोल ना मग. इतना हिचक क्यूं रहा तू?" तेवढ्यात चहा आला.
"नईम एक बात बोल, मला दुबईत काही काम मिळेल का?" चहाचा घोट घेत घेत उस्मानने कसेबसे विषयाला तोंड फोडले.
"अब्बे साले... ये बात है क्या? तो उसमे इतना शरमा क्यू रहा है पूछनेमे? मला वाटलं तुला काही पैसा वगैरे पाहिजे. नोकरी पाहिजे काय? ठीक आहे. मी एकदम कसं सांगू? पण दुबईमधे मी ज्या शेखकडे काम करतो ना, तो खूप मोठा माणूस आहे. त्याचे नोकर मोजायला एक माणूस ठेवावा लागेल. माझ्यासारखे ड्रायव्हरच दहाबारा आहेत त्याच्याकडे. काहीतरी करुच आपण. मी माझ्या मॅनेजरला विचारून बघतो. आणि तुला सांगतो." नईम अगदी सहजतेने म्हणाला. जणू काही मॅनेजरला विचारायचे ते केवळ उपचार म्हणून, बाकी सगळं पक्कंच झालंय. त्याची सहजता बघून उस्मानही सुखावला.
"काय काम करावं लागेल रे मला? मला तर ड्रायव्हिंग येत नाही."
नईम जोरात हसला... "सबर करो दोस्त, सबर करो. अरे आत्ताशी कुठे आपण बोलायला लागलोय. आणि तू नोकरी पक्कीच समजून उडायला लागला? वेळ लागतो रे. आणि काम मात्र काय पडेल ते करावं लागेल. हे नाही करणार ते नाही करणार नखरे नाही चालत तिथे. बघ, विचार कर." उस्मान आता सगळ्या विचारांच्या पलिकडे पोचला होता. त्याला आता डोळ्यापुढे दुबई, तिथले शेख, वाळवंट, मक्का, मदिना, उंट आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पैसा दिसायला लागला होता. त्यासाठी तो काय वाट्टेल ते करायला तयार होता.
तो नईमला म्हणाला, "हरकत नाही, नईम. बिल्कुल तक्रार नाही करणार. तू बोल तुझ्या साहेबाशी." नईमने परत एकदा त्याला आश्वासन दिले की तो पत्र लिहिल लवकरच. उस्मान हवेत तरंगतच दुकानात गेला. पुढचे काही दिवस तो केवळ शरीराने गावात होता. बाकी दुबईला तर तो कधीच पोचला. त्याला आता स्वप्नातही दुबई दिसत होती.
पाच सहा दिवसांनी एका संध्याकाळी नईम उस्मानच्या घरी आला. "उस्मान, एक खबर है. मी ज्या एजंटकडून दुबईला गेलो होतो ना त्याच्याशी मी बोललो. त्याला मी सगळी कल्पना दिली. माझ्या चांगल्या ओळखीचा आहे तो. त्याला म्हणलं की, उस्मान माझा दोस्त आहे आणि तो आपल्या पोराच्या भल्यासाठी दोन तीन वर्षं दुबईला जायचं म्हणतोय. काही असेल तर सांग. काल त्याने फोन केला होता. तो म्हणतोय की दुबईला एक ऑफर आहे. पण त्यात जरा प्रॉब्लेम आहे."
"काय?"
"हे बघ तो शेख खूप मोठा माणूस आहे. त्याच्याकडे खूप पैसा आहे. तो गरीब देशातल्या हुशार मुलांना घेऊन जातो आणि त्यांना खूप शिकवतो, पैसा देतो. एजंट म्हणतोय तुझ्याबरोबर चांदसाहेबाला घेऊन जायला तयार असशील तर आत्ता नोकरी देतो."
"काय? नईम तू काय बोलतोय तुला तरी कळतंय का?", उस्मान अक्षरशः हादरला. हे काहीतरी भलतंच समोर येत होतं.
"हे बघ उस्मान. मला कळतंय. आणि पटतंय पण. अरे असं बघ, तू पण त्याच शेखकडे नोकरी करणार, आणि चांदसाहेबपण तिथेच राहणार. मग काय हरकत आहे?"
"अरे पण, त्या ६ वर्षांच्या पोराला घेऊन इतक्या लांब कसा जाणार मी? आणि तो त्याच्या अम्मीशिवाय कसा राहिल? शक्य नाही ते."
"बघ बाबा, चांगला चान्स सोडतो आहेस तू. अरे अशी बरीच मुलं आहेत तिथे म्हणे. चांदसाहेबसाठीच करतो आहेस ना तू हे सगळं? मग, अशी संधी स्वप्नात तरी मिळाली असती का तुला? माझं ऐक आणि हो म्हण."
"नईम, बेगमको पूछेबिना मै कुछ बोल नही सकता."
"ठीक है, उस्मान, बराबर है. लेकिन बेगमको मनाओ. बायका प्यार मोहब्बत मधे अडकतात. दुनिया काय चीज आहे हे त्यांना माहित नसते. तू बेगमला पटव कसेही करून. आपल्याकडे अजून दोन दिवस टाइम आहे. याद रख. चलता हूं. खुदा हाफिझ."
नईम गेला. उस्मानच्या डोक्यात एक भुंगा सोडून गेला. दिवसभर तो भुंगा त्याचा मेंदू पोखरत राहिला, पण त्याची रशिदासमोर हा विषय काढायची हिंमतच नाही झाली. पण वेळ हातची जात होती. कसेही करून रशिदाला पटवायलाच पाहिजे. त्याने दुसर्या दिवशी हळूच तिला सांगितले.
"अल्ला रहम करे, मियाँ, आप होशमे तो है ना?" रशिदाचा अवतार केवळ बघण्यासारखा होता. "आपको बोल्तेभी खराब नै लगा? आज बोले सो बोले. परत बोललात तर माझ्यासारखी वाईट नाही कुणी, सांगून ठेवते." दिवसभर उस्मान तिला समजवण्याचा प्रयत्न करत होता. तिथे गेल्यावर चांदसाहेब कसा सुखात लोळेल, शिकेल, मोठा माणूस होईल. सग्गळं सग्गळं सांगून झालं. पण ती अज्जिबात बधली नाही. शेवटी नाईलाज होऊन त्याने नईमला नकार कळवला.
"देख उस्मान, तू मेरा दोस्त है. मी बघतो काही मार्ग आहे का ते." उस्मानपुढे मान डोलावण्याशिवाय उपाय नव्हता. नईम एवढ्या आपुलकीने सगळं करत होता, त्या ओझ्याखाली तो अजून दबत होता.
मधे एक दोन दिवस गेले आणि परत एकदा नईम उस्मानला भेटायला त्याच्या दुकानावर आला. "देख उस्मान, भाभी काय म्हणते की ती चांदसाहेबला एकटं सोडणार नाही ना? मग भाभीलापण नोकरी मिळाली तर? शेखच्या घरी नोकरी. त्याच्याकडे कुक किंवा मेड वगैरे म्हणून भाभीला नोकरी मिळवून दिली तर? आधी तुम्ही दोघं जा आणि तू सेट झालास, तुला तिथे पटलं तर मग पाच सहा महिन्यात भाभीपण येईल. मग तर झालं?"
"अरे नईम, म्हणजे आम्ही सगळेच तिथे? मला तर तू आजकाल काय बोलतो आहेस ते कळेनासंच झालंय. मी नुसती एक साधी नोकरी मागितली आणि इथे तू आणि तुझा तो एजंट आख्खं कुटुंबच्या कुटुंब पाठवायला निघाले!!!"
"उस्मान, प्रश्न नंतर सोडवत बस. आधी संधी साधून घे. तो शेख खूप मोठा आणि दयाळू आहे." बराच वेळ तो बोलत होता. उस्मान हळूहळू परत त्याच्या खुशहालीच्या स्वप्नात जायला लागला. शेवटी त्याच्याकडून हा नवीन प्रस्ताव रशिदाबरोबर चर्चा करेन या आश्वासनानंतरच नईम गेला.
उस्मानने अक्षरशः आपली सगळी बुद्धी पणाला लावून रशिदाला पटवले. नईमने जो आकडा सांगितला होता तो तर तीला मोजता पण येत नव्हता. एवढी संधी समोरून चालत येत आहे म्हणल्यावर तीपण हळूहळू डळमळली. पुढच्या गोष्टी पटापट घडल्या. तिघांचे पासपोर्ट एजंटनेच बनवून दिले. सगळे फॉर्म्स भरून घेतले. सह्या घेतल्या. एव्हाना नईम परत गेला होता. आता व्हिसाची वाट बघणे. रशिदाला तर हे सगळे शब्द कळतही नव्हते. ती सतत दुवा करत होती. सगळं काही नीट होऊ दे, देवा परमेश्वरा!!! चांदसाहेब तर पार बावरून गेला होता. त्याला फक्त एवढेच कळले होते की अब्बू आपल्याला घेऊन कुठे तरी लांब चालले आहेत. आणि अम्मी येणार पण नंतर. भिती वाटत होतीच त्याला. पण उस्मान त्याला रोज आपण विमानात बसणार, मग ते विमान कसे आकाशात जाणार वगैरे सांगून रमवायचा. त्यामुळे त्याला पण उत्सुकता लागत चालली होती. एकदाचा व्हिसा आला आणि आता लोकांना सांगायला हरकत नाही असा विचार करून तो सगळ्यात आधी काझीसाहेबांना सांगायला गेला.
"बेटा उस्मान, जो भी कर रहे हो सोच समझके करो. अल्लाह को याद करके करो. लक्षात ठेव, सुख पैशावर अवलंबून नसतं. त्याही पलिकडे असतं. सांभाळून रहा." काझीसाहेब म्हणत होते.
"हो काझीसाहेब. मी लक्षात ठेवेन. मला तिथे गेल्यावर अरबस्तानातल्या पवित्र मातीत रहायला मिळेल. जिथे पैगंबरसाहेब राहिले ती माती पवित्र आहे."
"उस्मान, मिट्टी मिट्टी होती है. उसमे पाक क्या नापाक क्या? माणूस पाक तर माती पण पाक. हा नजरेचा फरक आहे. मातीच्या मागे लागून माती करून घेऊ नकोस. कल्पनेतल्या सुखसमृध्दीसाठी तू वास्तवातल्या सुखाचा सौदा करतो आहेस. तू निर्णय घेतलाच आहेस. कृपाळू परमेश्वर तुझं रक्षण करो."
तयारी होत होती. रशिदाचा जीव रोज थोडा थोडा तुटत होता. कितीतरी वेळा हे सगळं एक स्वप्नं ठरावं, आपल्याला एकदम जाग यावी असं तिला वाटायचं. पण स्वप्नं चालूच राहिलं. संपलंच नाही. उस्मानशी काही बोलायला जावं तर तो त्याच्या स्वप्नांमधे एवढा गुरफटला होता की त्याला आता त्यापुढे सगळं जग तुच्छ वाटत होतं. आपला साधा सरळ नवरा अचानक एवढा कसा बदलला याचंच तिला आश्चर्य वाटत होतं. तिच्या सगळ्या गप्पा ऐकून घेणारा, तिला खुष ठेवायला धडपडणारा उस्मान गायबच झाला होता आणि त्याच्या जागी हा अगदी हुबेहूब त्याच्या सारखा दिसणारा पण आतून पूर्णपणे वेगळा असलेला उस्मान तिला दिसत होता. हे बरोबर नाहीये, तिचे मन सारखे तिला सांगत होते. पण आता प्रकरण एवढं पुढे गेलं होतं की ते थांबवणं आता शक्य नाही हे तिला कळत होतं. आणि एकदाचा तो दिवस आला. उस्मान आणि चांदसाहेब नवीन कपडे घालून तयार होऊन बसले होते. रशिदाची आई आणि भाऊ आले होते. त्यांना पण हे सगळे पटले नव्हते पण पोरीच्या संसारात कसं बोलणार म्हणून ते गप्प होते. दारात गाडी आली. तालुक्याला रेल्वे स्टेशनपर्यंत गाडीतून जायचे होते. गल्लीतले लोक जमले. काझी साहेब आले. त्यांनी दुवा-ए-सफर म्हणला. रशिदा आणि उस्मान एवढ्या सगळ्या लोकांसमोर फक्त डोळ्यांनीच एकमेकांशी बोलत होते. त्या क्षणी उस्मानही त्याच्या स्वप्नाच्या दुनियेतून खाली आला होता. दोघं गाडीत बसले, उस्मानने 'बिस्मिल्लाह अर्रहमान अर्रहीम' म्हणले, ड्रायव्हरने गाडी सुरू केली. काही झाले तरी आता मागे वळून बघायचे नाही, उस्मान स्वतःला बजावत होता. पोराच्या भल्याकरता देत असलेली किंमत त्याला चुकती करायचीच होती. त्याने डोळे पुसले आणि चांदासाहेबकडे बघितले. तो बिचारा भेदरून त्याला घट्ट बिलगून बसला होता. त्याला हे सगळं कळत नसलं तरी असह्य होतंय हे स्पष्ट जाणवत होतं त्याच्या चेहर्यावरून. उस्मानने त्याला गोष्ट सांगायला सुरूवात केली. थोड्यावेळाने चांदसाहेब झोपून गेला.
जिल्ह्याच्या गावी क्वचितच जाणार्या उस्मानला मुंबई आल्यावर भयानक दडपून गेल्यासारखं झालं. तिथले रस्ते, दुकानं, गाड्या, इमारती. त्याने सिनेमात जरी हे सगळे बघितले असले तरी प्रत्यक्षात बघितल्यावर तर तो घाबरूनच गेला होता. एजंटचा माणूस त्याला स्टेशनवर घ्यायला आला होता. तिथून एक दिवसापुरतं त्यांना एका लॉजवर नेलं त्याने. दुबईला जायचे विमान संध्याकाळी होते. दुपारी तो एजंट दोन नवीनच माणसांना घेऊन आला.
"उस्मान, ये दोनो साब डॉक्टर है. चांदसाहेबला तपासणार आहेत. शेखसाहेबांना मुलं त्यांच्यासमोर एकदम नीट आणि धडधाकट दिसायला हवी असतात." त्यांनी चांदसाहेबला तपासले. सगळे काही ठीक होते. उस्मान त्या आत्ता पर्यंत न पाहिलेल्या दयाळू शेखसाहेबांना दुवा देत होता. तो अगदी भारावून गेला होता. कोण कुठला शेखसाहेब. केवळ गरिब मुलांना मदतच नव्हे तर त्या करता त्या मुलांच्या आईवडिलांना पण नोकरी देतो हा शेखसाहेब. वल्लाह... काय पाक आणि नेकदिल आहे माणूस. प्रत्येक नमाजानंतर तो त्या शेखसाहेबांसाठी मुद्दाम दुवा देत असे. बास्स... आता उद्या दुबई. त्या शेखसाहेबांना एकदा भेटायचे आणि आभार मानायचे. बरोबर असलेला एजंटचा माणूसपण सतत शेखसाहेबांबद्दल बोलत होता. शेखसाहेब कसे दानी आहेत, त्यांनी गरीब देशांत किती मशिदी बांधल्या आहेत, दर वर्षी रमझानमधे लाखो रूपये कसे दान देतात... सतत हेच.
संध्याकाळी विमानतळ. उस्मानला आता मात्र खरंच भिती वाटायला लागली होती. चांदसाहेब तर पार गारठूनच गेला होता. एकदाचं सगळं पार पडलं आणि विमान उडलं. चांदसाहेब उस्मानला जो चिकटून बसला होता तो काही केल्या सोडतच नव्हता. मधे एकदा एअर होस्टेस्स त्याच्यासाठी चॉकलेट्स आणि खेळणी घेऊन आली तेव्हा तो जरा खुष झाला होता. पण तेवढंच. अडिच तीन तासात विमान दुबईला पोचलं. उस्मानने जे काही दृष्य खिडकीतून बघितलं ते त्याला जन्नतपेक्षाही जास्त मोहवून गेलं. असंख्य दिव्यांनी जमिन अगदी लगडून गेली होती. अंधार नावालाही दिसत नव्हता. जसजसं विमान खाली आलं तसतसे रस्ते आणि त्यावरून वेगाने धावणार्या मोटारी दिसू लागल्या. विमानाचा एक जोराचा आवाज आला आणि हलकासा धक्का बसून विमानाने जमिनीला स्पर्श केला. विमान अल्लाद उतरले. बराच वेळ झाला तरी विमान चालतच होते. शेवटी एकदाचे थांबले. एजंटने उस्मानला सगळे व्यवस्थित समजवले होते. त्याप्रमाणे तो चांदसाहेबला घेऊन विमानाच्या बाहेर आल्यावर तिथे त्याला एक माणूस भेटणार होता. तो पुढचे सगळे सोपस्कार आटोपून त्यांना मुक्कामाला नेणार होता. चांदसाहेब झोपला होता. त्याला तसाच घेऊन उस्मान बाहेर आला. त्याला काही शोधायची गरजच पडली नाही. तिथे पायघोळ अरबी कपडे घातलेले दोघंजण उभे होते. त्यांच्या हातात फोटो होते. त्यांनी उस्मानला लगेच इशारा केला. त्या दोघांचे पासपोर्ट ताब्यात घेऊन त्यांना पुढचे सोपस्कार पार पाडायला घेऊन गेले. उस्मान बिचारा ते जातील तिथे त्यांच्या मागेमागे फिरत होता. ते काहीच बोलत नव्हते. त्याचा खांदा अवघडला होता. एकदाचे सगळे झाले. सामान घेऊन त्यांना विमानतळाच्या बाहेर आणले. एका भल्या मोठ्या व्हॅनमधे बसवले. गाडी निघाली. जवळ जवळ तासभर गेल्यावर एक खूप मोठ्ठं गेट आलं. त्या गेटच्या आजूबाजूला खूप हिरवळ आणि झाडं होती. गाडी आत आली. बरोबरचे ते दोघं आधी खाली उतरले. उस्मान चांदसाहेबला घेऊन उतरला.
तेवढ्यात त्या दोघांतला एक जण त्याच्या जवळ आला आणि हिंदीत म्हणाला.... "बच्चा इधर दे दो. हमारे पास. और तुम ये दुसरा आदमी के साथ जाव."
उस्मान बावचळल्यासारखा बघतच राहिला. त्याला कळेचना हा माणूस काय बोलतोय ते. तसा तो पहिला माणूस परत त्याच्यावर ओरडला. "एय, पागल. क्या देखता है? बच्चा दे दो. और तुम इसके साथ जाव." आणि त्याने जवळ्जवळ चांदसाहेबाला हिसकून घेतले आणि जायला लागला. उस्मान बधिर होऊन उभा होता... जे काही घडलं त्याची त्याला काहीच अपेक्षा नव्हती... आणि इतकं पटकन सगळं घडलं की त्याल अजूनही कळलं नाही काय चाललंय ते... या सगळ्याप्रकारामुळ चांदसाहेब जागा झाला होता पण तो एवढा भेदरला होता की तो रडतही नव्हता.
तो अस्पष्टसं पुटपुटला... "साब, मेरा बेटा... किधर लेके जा रहे हो... हम साथ मे रहने वाले है..."
तेवढ्यात तो दुसरा माणूस त्याच्या जवळ आला आणि म्हणाला...
क्रमशः
http://www.misalpav.com/node/8356
एन डी पाटिल - महाराष्ट्रातील एक लोकनेते - मुलाखत
Posted by मी बिपिन. on रविवार, जून २८, २००९
लेबल्सः माहिती
सध्या घरच्या डिशटिव्हीच्या कनेक्शनचे काहीतरी लफडे झाले आहे. वृत्त वाहिन्यांमधे फक्त झी२४तास आणि आयबीएन-लोकमत या दोनच वाहिन्या उपलब्ध आहेत. 'समथिंग इज बेटर दॅन अज्जिबात नथिंग' या न्यायाने सध्या आयबीएन-लोकमतच बघत असतो. नाविलाज आहे. पण परवा अचानक एक चांगला कार्यक्रम बघायला मिळाला.
'ग्रेट भेट' नावाचा एक कार्यक्रम असतो. त्यात आयबीएन-लोकमतचे सर्वेसर्वा निखिल वागळे हे प्रसिद्ध आणि महत्वाच्या व्यक्तींच्या मुलाखती घेतात. परवाच्या कार्यक्रमात अतिशय जुने आणि वरिष्ठ राजकारणी डॉ. एन. डी. पाटिल यांची मुलाखत घेतली गेली. एनडी (त्यांना सगळे एनडीच म्हणतात) बद्दल मला फक्त एवढीच माहिती होती की ते एक राजकारणी आहेत आणि शे. का. पक्षाचे प्रमुख नेते आहेत. मुलाखत बघताना हा माणूस किती मोठा आहे हे कळले. मुलाखत अर्ध्याच तासाची होती.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला म्हणले गेले तसे, जरी त्यांनी शे.का. पक्षाचे नेतृत्व केले असले तरी आज ते खर्या अर्थाने सर्वपक्षिय झाले आहेत. महाराष्ट्रातील सगळ्याच प्रमुख लोकचळवळींशी ते आजही जातीने निगडीत आहेत. त्यांना बघूनही ते ८० वर्षांचे असतील असे वाटत नाही. महाराष्ट्रात जिथे जिथे सेझ विरोधात म्हणा किंवा तथाकथित आधुनिक विकासामुळे भूमिपुत्र भरडला जात आहे तिथे त्यांचा सक्रिय पाठिंबा आहे. ते स्वतः तिथे जाऊन मार्गदर्शन करतात.
त्यांच्या बोलण्यात खूपच सच्चेपणा वाटला. कोणाचाही मुलाहिजा न ठेवता, आपलं मत ते बेधडक मांडतात. आयुष्यभर स्वच्छ राहिलेला माणूसच हे करू शकतो. इतर राजकीय नेत्यांबद्दल त्यांनी मांडलेली मतं खरोखरच जहाल आहेत. देशातील सगळेच राजकारणी हे कोणाला ना कोणाला तरी विकले गेले आहेत हे स्वतः राजकारणात राहून स्पष्टपणे ठणकावून सांगणे हे सोपे नाही. आधुनिक चाणक्य शरद पवार हे त्यांचे मेव्हणे. पवार हे एनडींच्या बायकोचे भाऊ. पण पवारांच्या प्रभावाखाली नसलेला एकमेव नेता असे त्यांचे वर्णन केले जाते असे वागळे म्हणाले. कर्मवीर भाऊराव पाटिलांच्या तालमीत तयार झालेला हा गडी अजूनही रयत शिक्षण संस्थेची गाडी हाकत आहे.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला राजकारणी वाटलेले एनडी मुलाखतीच्या शेवटी मात्र त्यापेक्षा खूप मोठ्ठे समाजकारणी आहेत असेच वाटले.
हा कार्यक्रम आपल्याला http://www.ibnlokmat.tv/gallery.php?id=1&conid=57082 या लिंकवर बघता येईल.

आत्ताच मी नेहमीप्रमाणे पाकिस्तानी वृत्तपत्र 'द डॉन' ची जालआवृत्ती चाळत होतो. नेहमी काहीनाकाही छान मिळते वाचायला. आज तर आश्चर्याची परमावधी झाली. पटकन एका कोपर्यातल्या बातमीकडे नजर गेली. अक्षरशः उडालो... बातमी होती...
"Silence! The court is in session - Veteran stage and TV artist Rahat Kazmi directs the play of India's legendary writer Vijay Tendulkar. "
http://www.dawn.com/wps/wcm/connect/dawn-content-library/dawn/news/entertainment/05-silence-the-court-is-in-session
तेंच्या "शांतता! कोर्ट चालू आहे" या नाटकाचा प्रयोग १६ मे ला उर्दूमधे कराचीत झाला, त्याची ही बातमी आणि छोटेखानी परिक्षण. बातमी मुळातून वाचण्यासारखी आहे. नाटक आणि त्याचे सादरीकरण या दोन्हीबद्दल स्तुति केली आहे. पाकिस्तानातले बहुतेक ग्रेट कलाकार इथेही तितकेच नावाजले गेले आहेत. पण आपल्या इथले सिनेकलाकार आणि उर्दू साहित्यिक सोडल्यास इतर भाषांमधून काही तिकडे गेले असेल असे वाटले नव्हते. आज अचानक हे सापडले. पाकिस्तानात नाटक वगैरे कला जिवंत आहेत आणि बर्यापैकी सुस्थितीत असाव्यात असेही वाटले.
शेवटचा परिच्छेद मुद्दम उद्धृत करत आहे:
If nothing else, the play is worth the Rs 500 price tag for its powerful dialogues, especially that of Benare in the end which sums up the dark undertones of our society. Students can avail a 50 per cent discount on the ticket.
५०० रू. तिकिट काढून लोक नाटक , ते पण एका भारतिय नाटककाराचे, बघायला येतात हे नक्किच कौतुकास्पद आहे. बेणारेबाई ही इथेच नव्हे तर तिथेही (किंबहुना कुठेही) तितकीच रेलेव्हंट (मराठी प्रतिशब्द?) वाटते!!! हेच ते तेंचे मोठेपण का?
***
खूप आनंद वाटतो आहे. हा धागा टाकायचे कारण की
०१. हा आनंद सगळ्यांबरोबर वाटावा असे वाटले.
०२. या निमित्ताने तें कसे जगभर पोचले आहेत त्या बद्दल अजून ऐकायला / चर्चा करायला आवडेल.

काही दिवसांपूर्वी मिपावर कम्युनिस्ट विरुद्ध इतर असा एक जबरदस्त कलगीतुरा रंगला होता. पब्लिक नुसतं तुटून पडलं होतं. बरीच राळ उडली होती. त्या निमित्ताने लहानपणी वाचलेली रशियन भाषेतून (बहुतेक अनिल हवालदार यांनी) मराठीत भाषांतरित केलेली पुस्तकं, एका मित्राच्या घरी (त्यावे वडिल सीपीआयचे मेंबर) येणारे सोविएत साहित्य (मासिकं, पुस्तकं) वगैरे आठवणी जाग्या झाल्या. मग काही दिवस जालावर कम्युनिस्ट विचारसरणी, सोविएत युनियन, पोलादी पडदा वगैरे बद्दल वाचत होतो. शीतयुद्धाच्या काळात पोलादी पडद्यामागचं जग खरंच कसं होतं हे कुतूहल तेव्हाही होतंच. कशी काय माणसं वर्षानुवर्षे एखाद्या यंत्रासारखी वागू शकतात (इंग्रजीमधे रेजिमेंटेशन हा अगदी चपखल शब्द आहे), करोडो लोकांचं आयुष्य म्हणजे प्रचंड शक्तिशाली पण एखाद्या लहानशा बटणाच्या मर्जीवर नाचणार्या वीजेसारखं कसं काय नियंत्रित होऊ शकतं हे प्रश्न माझ्या बालमनात तेव्हाही यायचे. ही प्रचंड जनशक्ती कशी हळूहळू दबत जाऊन तिचा एक मोठ्ठा सुरूंग झाला आणि एके दिवशी अगदी लहानशा घटनेमुळे त्याचा स्फोट झाला. पण त्याहूनही रंजक त्याआधीचा इतिहास आहे.
आता आंतरजालामुळे, जवळजवळ सगळीच माहिती उपलब्ध आहे. मला जर्मनीबद्दल पहिल्यापासूनच विशेष आकर्षण आहे. त्यामुळे पूर्व जर्मनीबद्दल विशेष लक्ष देऊन वाचत होतो. कम्युनिझमच्या दडपणाखाली सुध्दा पूर्व जर्मनीने अचाट अशी प्रगती केली होती. पोलादी पडद्याआडचे ते सगळ्यात जास्त प्रगत राष्ट्र (सोविएत युनियनपेक्षाही जास्त प्रगत) होते. आर्थिक निकषांवर त्यांनी काही पश्चिम युरोपातल्या भांडवलशाही देशांनाही मागे टाकले होते. जर्मनांची उद्यमशीलता आणि राष्ट्रप्रेम कम्युनिझमचा वरवंटापण दडपू शकले नाही. तर एकंदरीतच खूप मनोरंजक माहिती कळत होती.
वाचताना एका वेगळ्याच धाटणीच्या चित्रपटाबद्दल कळलं. चित्रपटाचं नाव, "गुडबाय लेनिन!". नावामुळेच कुतूहल चाळवले गेले. आधी वाटले की कसा लोकांनी उठाव केला, कम्युनिस्ट सत्ता उलथून टाकली वगैरे बद्दल एखादा माहितीपट असेल. पण नाही... काहीतरी वेगळंच होतं हे प्रकरण. मग ठरवलं की बघायचाच. जर्मनीमधे २००३ साली बनलेला हा चित्रपट पूर्णपणे जर्मन भाषेत आहे. त्यामुळे सबटायटल्स असतील तरच कळणार ना. म्हणून मग जालावर सबटायटल्ससकट कुठे उपलब्ध आहे का त्याचा शोध सुरू केला... आणि काल परवा मिळाला एकदाचा.
ही आहे केर्नर कुटुंबाची गोष्ट, ऑक्टोबर १९८९ मधे सुरू होते जेव्हा पूर्व जर्मनीला शेवटचे आचके यायला नुकतीच सुरूवात झाली होती आणि साधारण ऑक्टोबर १९९० पर्यंत संपते, जेव्हा पूर्व जर्मनीचे पश्चिम जर्मनी मधे विलिनीकरण होऊन परत एकदा एक एकसंध जर्मनी दिमाखात जगाच्या नकाशावर अवतरतो.
अलेक्झांडर केर्नर हा १८ वर्षांचा मुलगा आपल्या आई (ख्रिस्तिआन) आणि बहिण (अरिआन) बरोबर राहत असतो. सुरूवातीच्या काही दृष्यातून आपल्याला अलेक्झांडरच्या लहानपणाबद्दल फ्लॅशबॅक्स मधून कळतं... त्याचे वडिल तो १० वर्षांचा असताना पश्चिम जर्मनीला पळून गेलेले असतात. त्यानंतर त्याची आई भ्रमिष्ट होते, पण काही उपचारांनंतर सुधारते. त्यानंतर ख्रिस्तिआन स्वतःला कम्युनिस्ट पार्टीच्या कामाला वाहून घेते. ती एक शिक्षिका असते आणि विद्यार्थ्यांमधे खूपच लोकप्रिय असते. ती लोकांच्या समस्या स्वतःच्या पार्टीकनेक्शन्सच्या जोरावर सोडवून देते, त्यामुळे तिला आजूबाजूच्या वर्तुळात एक मानाचे स्थान असते. असं सगळं सुरळित चालू असताना, एक दिवस येतो आणि सगळं उलटपालट करून जातो.
निमित्त असतं पूर्व जर्मनीच्या ४०व्या वर्धापनदिनाचं. कम्युनिस्ट जगात गोर्बाचोवनी आणलेल्या बदलाच्या वार्यामुळे पूर्व जर्मनीच्या तत्कालिन सत्तावर्तुळात अतिशय मूलभूत बदल होतात. आणि त्यामुळे भीड चेपलेल्या पूर्व जर्मनांची जोरदार निदर्शनं सुरू होतात. त्यांना इतर देशात (म्हणजे पश्चिम बर्लिन) जायचे मुक्त संचार स्वातंत्र्य हवे असते. आपले नुकतेच १८ वर्षाचे झालेले अलेक्झांडरभाऊ पण त्यात सामिल होतात. त्याला यथासांग अटक आणि मारहाण होते. आणि नेमकी त्याची आई (ख्रिस्तिआन) ते बघते आणि तिला हार्ट अॅटॅक येऊन ती तिथेच कोसळते. अलेक्झांडर तिला बघतो पण पोलिस त्याला मारहाण करून गाडीत घालून घेऊन जातात. तो काहीच करू शकत नाही. पण इकडे पोलिस ख्रिस्तिआनवर उपचार करतात, आणि तिच्या एकंदरीत प्रतिष्ठेमुळे अलेक्झांडरची पण सुटका होते. तो हॉस्पिटलमधे येतो आणि त्याला कळते की उपचारांत उशिर झाल्याने त्याची आई कोमात गेली आहे. पुढचे सगळेच अनिश्चित झालेले असते. तिला हॉस्पिटलमधे ठेवून फक्त शुश्रूषा करत राहणे एवढेच शक्य असते.
हळूहळू दिवस जात असतात. बाहेर अतिशय वेगाने घटना घडत असतात. कम्युनिस्ट राजवट जाते. पूर्व जर्मनीमधे पहिल्यांदाच मुक्त निवडणुका होतात. नवीन राज्यकर्ते येतात. जर्मनीच्या एकीकरणाची बोलणी चालू असतात. इकडे अलेक्झांडरचे त्याच्या आईची सेवा करणार्या लारा नावाच्या नर्सबरोबर सूत जुळते. आयुष्य अडखळते पण मग परत हळूहळू वेग घेऊ लागते. आणि एक दिवस अचानक आईसाहेब चक्क व्यवस्थित शुध्दीत येतात. सगळ्यांना आनंद होतो. पण डॉक्टर मात्र अगदी स्पष्टपणे सांगतात, तिचे हृदय अतिशय नाजुक झालेले आहे आणि तिला कोणत्याही प्रकारचा धक्का सहन होणार नाही. आता मात्र सगळेच घाबरतात. कारण हे की, ती कोमात असताना जी काही उलथापालथ झाली आहे, ज्या विचारसरणीवर एवढा विश्वास ठेवून आयुष्यभर काम केले ती विचारसरणी, तो देश अगदी पाचोळ्यासारखे उडून गेलेले बघितले तर तिचा मृत्यू नक्की. आता काय करणार? प्रत्यक्षातून पुसला गेलेला पूर्व जर्मनी हा देश परत कसा आणणार? आणि तो सुद्धा किती दिवस? सगळेच प्रश्न.
अलेक्झांडर मात्र एकदम हिकमती पोरगा असतो. तो आईला घरी आणतो, घराला परत जुनं रूप देतो. जुन्या पध्दतिचे कपडे परत वापरायला काढतो. त्याची बहिण आरिआन पण सामिल होते. आता एकामागे एक अशी संकटं यायला लागतात. सगळ्यात पहिलं म्हणजे, आईला हवा असतो टिव्ही. आता टिव्ही लावला तरी त्यावर दाखवणार काय? मग अलेक्झांडर त्याच्या एका मित्राच्या सहाय्याने खोट्या बातम्या, खोटे व्हिडिओ वगैरे तयार करून ते सगळे व्हीसीआर टिव्हीला जोडून तिला दाखवत राहतो. मग एक दिवस नेमका त्यांच्या घराच्या समोरच्या उंच इमारतीवर कोकाकोलाची जाहिरात लावली जाते आणि नेमकी ख्रिस्तिआन ती बघते. आता हे कसे काय? साक्षात भांडवलशाहीचा देव कोकाकोला पूर्व जर्मनी मधे? ती हादरतेच. मग अलेक्झांडर आणि त्याच्या मित्राची पळापळ. ते एक अशी बातमी तयार करून दाखवतात की कोकाकोला कम्युनिझमला शरण आला आहे, कोकाकोलाचा फॉर्म्युला हा खरंतर कम्युनिस्टांनीच शोधून काढला होता पण तो अमेरिकनांनी पळवून नेला होता असं सिध्द झालंय वगैरे !!! असे बरेच किस्से घडतात. पण पठ्ठ्या अलेक्झांडर सगळ्याला पुरून उरतो. त्याची आपल्या आईला जगवण्याची धडपड आणि त्यातल्या गंमती एकीकडे हसायला लावतात पण मनाला चटका लावून जातात. सगळे त्याला सांगत असतात की बाबारे असं किती दिवस करणार तू? पण हा पोरगा आपला हट्ट सोडत नाही. इतक्यात त्याच्या वडिलांचा पत्ता लागतो. ते आता पश्चिम जर्मनी मधे एक सुखवस्तू डॉक्टर झालेले असतात. त्यातच त्याची आई त्याला वडिलांच्या जाण्यामागची खरी कारणं सांगते आणि फक्त एकदा आपल्या नवर्याला भेटायची इच्छा व्यक्त करते. अलेक्झांडर अगदी ती सुध्दा पूर्ण करतो.
ज्या दिवशी पूर्व जर्मनी विलिन होतो त्यानंतर बरोब्बर तीन दिवसांनी ख्रिस्तिआन शांतपणे मरते. एका खूप मोठ्या ताणातून सगळेच मुक्त होतात. अलेक्झांडरने शेवटपर्यंत केवळ आपल्या आईचं मन मोडू नये म्हणून एक अस्ताला गेलेला देशच्या देश अगदी यशस्वीपणे तिच्या त्या छोट्याशा खोलीमधे उभा केलेला असतो. चित्रपट संपतो तेव्हा आपण नकळतपणे अलेक्झांडरच्या बाजूला उभे राहून ख्रिस्तिआनला शेवटचा निरोप देत असतो. आणि एकीकडे वाईट वाटत असूनही, "चला!!! आता अलेक्झांडर सुटला बिचारा धावपळीतून" असं वाटून हायसं वाटतं.
कथेच्या अनुषंगानेच पण त्या एक वर्षात घडलेल्या घटनांचा जो काही विदारक सामाजिक परिणाम झाला त्याचे पण चित्रण सुंदर केले आहे. बळजबरीने उभारलेली का होईना, पण एक आख्खीच्या आख्खी जीवनपध्दती जेव्हा इतक्या पटकन लयाला जाते, तेव्हा नुसत्याच भौगोलिक सीमारेषा नव्हे तर लोकांची आयुष्यं उद्ध्वस्त करून जाते. ज्या व्यवस्थेच्या आधारावर लोकांनी आयुष्यं घालवली ती एका रात्रीत नष्ट होऊन लोकांना, विशेषतः म्हातार्या पेन्शनर लोकांना अक्षरशः रस्त्यावर आणते, वैफल्यग्रस्त करते.
कोणत्याही प्रकारची ड्रामेबाजी, रडारड वगैरे (वाव असूनसुद्धा) नाही, एकही प्रसंग / फ्रेम भडक नाही. अगदी वेगळीच कथा आणि अलेक्झांडर, ख्रिस्तिआन, अरिआन, लारा या मुख्य पात्रांचा अतिशय सहजसुंदर अभिनय एक सुखद कलानुभव देऊन जातो. पूर्ण चित्रपट एका वेगात जातो, कुठेही रटाळ अथवा कंटाळवाणे होत नाही. सतत, "आता काय नवीन भानगड होईल? पुढे काय आता?" असं वाटत राहतं. चांगले चित्रपट बघायची इच्छा असणार्यांनी अगदी जरूर बघावा हा चित्रपट.
हा चित्रपट मला जालावर टॉरेंटच्या माध्यमातून मिळाला. कोणाला इच्छा असल्यास टॉरेंट फाईल पाठवेन.

युध्दस्य कथा रम्या: असं एक संस्कृत सुभाषित आहे. माझ्यापुरतं तरी ते १००% खरं आहे. लहानपणापासून युद्धकथा वगैरे वाचायची आवड होतीच. पुढे शाळकरी वयात दुसर्या महायुद्धाने आणि त्यातल्या त्यात जपान नावाच्या काहीतरी गूढ प्रकाराने तर अजूनच. युध्दाआधीचा जपान, तिथले प्रचंड लष्करीकरण, औद्योगिक प्रगति पण जुन्या रितीरिवाजांना / परंपरांना कवटाळून बसायची प्रवृत्ति... असे बरेच परस्पर विरोधाभास असल्याने एकंदरीतच जपान बद्दल गूढ वाटायचे / वाटते. तर, दुसर्या महायुद्धात झालेल्या काही अतिशय महत्वाच्या आणि ज्यामुळे युध्दाला अतिशय महत्वाची कलाटणी मिळाली अशा युध्दांबद्दल वाचत असताना, एक थोडेसे चमत्कारिक नाव कानावर पडले. "इवो जिमा". नाव कायमचे लक्षात राहिले.
"इवो जिमा" हे जपानी बेटसमूहापैकी एक बेट. जपानच्या मुख्यभूमी पासून खूपच दूर. युध्दात जेव्हा जपानची पीछेहाट सुरू झाली तेव्हा मुख्यभूमीच्या बचावासाठी जपानी सैन्याने इथे घट्ट पाय रोवून ठाण मांडले होते. या बेटाचे महत्व असे की, हे जर अमेरिकेच्या हाती पडले तर तिथे अमेरिकेला तळ बनवून सैन्य, आरमार आणि विमानं वगैरे ठेवता आले असते. आणि मग या तळाचा उपयोग मुख्यभूमीवर बाँबवर्षाव आणि हल्ले करण्यासाठी झाला असता. तेव्हा हे बेट वाचवणे हे अतिशय आवश्यक होते. पुढे अतिशय घनघोर लढाई झाली आणि शेवटी हे बेट अमेरिकेच्या हाती पडले. आजही अमेरिकेच्या मरिन कोअर साठी हे बेट एक तीर्थक्षेत्र आहे. नवीन भरती झालेले इथे श्रध्दांजली वाहण्यासाठी येतातच. तर जपानी सरकारनेही या बेटावर बराचसा भाग प्रतिबंधित केला आहे कारण जवळजवळ १० हजार जपानी सैनिकांची प्रेतं (अवशेष) तिथे विखुरलेली आहेत.
तर अशा या ऐतिहासिक घटनेवर आपल्या क्लिंट इस्टवुड आजोबांनी एक चित्रपट काढला आणि स्वतः दिग्दर्शित केला. खूप दिवसांपासून बघायची इच्छा होतीच. आज योग आला. अक्षरशः एकदाही जागचे न उठता बघितला हा चित्रपट. चित्रपट सत्य घटनांवर बेतलेला आहे. या लढाईत ज्याने जपानी सैन्याचे नेतृत्व केले होते, त्याने वेळोवेळी आपल्या बायको आणि मुलांना लिहिलेल्या पत्रात लढाईच्या आधीच्या तयारीचे आणि प्रत्यक्ष लढाईचे वर्णन केले होते. त्यावर आधारित एक पुस्तक निघाले आणि त्यावर आधारित हा चित्रपट. चित्रपट पूर्णपणे जपानी भाषेत आहे. इंग्लिश सबटायटल्स आहेत. काही काही प्रसंगात सबटायटल्स नसले तरी भाषा आड आली नसती एवढे सुंदर काम केले आहे अभिनेत्यांनी. साधारण कथानक असे.
इवो जिमा वर जपानी सैन्य ठाण मांडून बसले आहे. त्या सैन्याचा प्रमुख म्हणून ले. जनरल तदामिची कुरिबायाशी याची नेमणुक झाली आहे आणि तो अधिकार सूत्र हातात घ्यायला येतो. त्याच्या स्वागताला काही अधिकारी उपस्थित असतात. तिथपासूनच त्याच्या आधुनिक आणि कल्पक विचारांची आणि त्या जुन्या अधिकार्यांच्या जुनाट / पारंपारिक विचारांची लढाई सुरू होते. बेटाची पाहणी करता करता त्याला असे आढळते की जरी अमेरिकेचे सैन्य बोटींमधून किनार्यावर उतरेल तरी तिथेच (म्हणजे किनार्यांवर) त्यांच्याशी लढणे कठिण जाईल. बेटाच्या एका भागात त्या बेटावरचा सगळ्यात उंच डोंगर असतो. बेत असा ठरतो की सगळे किनारे मोकळे सोडायचे आणि त्या डोंगरावर तळ बनवायचा. जपानी सैन्यात 'साइगो' नावाचा एक सामान्य शिपाई दाखवला आहे. तो पेशाने बेकर असतो पण जबरदस्तीने सैन्यात भरती केले असते त्याला. हा या चित्रपटाचा दुसरा नायक. (रूढार्थाने या चित्रपटाला नायक नसला तरी कुरिबायाशी आणि साइगो ही मुख्या पात्रं आहेत. त्यांच्या नजरेतून, आठवणींमधून चित्रपट पुढे जातो.) तर हा साइगो युध्दाला कंटाळलेला असतो, त्याला युध्द वगैरे प्रकारातला फोलपणा कळून चुकलेला असतो. लढाई सुरू होते आणि नेहमीच्याच मार्गाने जात राहते. बरेचसे जपानी सैनिक मरतात. शेवटी अगदी मोजके सैनिक राहतात. कुरिबायाशी स्वत: जातीने त्यांना घेऊन हल्ला करायला निघतो. तुंबळ लढाई होते, आणि..... पुढचे बघायचे असेल तर चित्रपटच बघा.
या संपूर्ण प्रवासात, जपानी संस्कृती मधले जे काही कट्टर प्रकार आहेत ते अगदी छान टिपले आहेत. शत्रूच्या हाती जिवंतपणे न पडणे हे अतिशय महत्वाचे आहे. त्यासाठी मग हाराकिरी आलीच. लढाईच्या सुरूवातीला एका भागात जपानी सैन्याचे अगदी पानपत होते. काही मोजके सैनिक आणि २-३ अधिकारी उरतात. कुरिबायाशी त्यांना कसंही करून तिथून जीव वाचवून पळून येऊन दुसर्या एका भागातल्या तुकडीला मदत करायला सांगतो, पण या तुकडीच्या मुख्य अधिकार्याला ते पटत नाही आणि तो स्वत: हाराकिरी तर करतोच पण बाकीच्या सैनिकांना पण भाग पाडतो. साइगो तिथेच असतो, पण तो जीव वाचवून अळतो तिथून. दुसरीकडे जाऊन मदत करण्याऐवजी, 'दिलेली जबाबदारी मला पार पाडता आली नाही म्हणून जीव देणे अधिक योग्य' अशा प्रकारच्या आत्मघातकी विचारांमुळे जपानी सैन्य अजून कमजोर आणि संख्येने घटत जाते. समोर मृत्यू अटळ दिसत असताना सैनिक सगळी सामानाची आवराआवरी करतात वगैरे दृश्ये छान घेतली आहेत.
अजून एक छान दृश्य / संवाद म्हणजे.... एक जखमी अमेरिकन सैनिक जपान्यांच्या हाती लागतो. त्याच्या जवळ त्याच्या आईने लिहिलेले पत्र असते. त्या पत्राचे जाहिर वाचन तिथला इंग्लिश बोलणारा अधिकारी जपानी मधून करतो तेव्हा साइगोचा एक साथी त्याला म्हणतो, "माझ्या आईने पण मला अगदी हेच सांगितले आहे".
युध्दासारखा तीव्र भावनिक विषय असला तरी पूर्ण चित्रपट अतिशय संयतपणे पण त्यामुळेच परिणामकारी पद्धतीने मांडलेला आहे. (आपल्याकडचे काही 'बॉर्डर' वगैरे युद्धपट आठवले, तुलना करवतच नाही.) कुठेही आरडाओरडा नाही, डायलॉगबाजी नाही. उपदेश वगैरे नाही. सगळं कसं अगदी 'रिअल लाईफ'. बरंचसं चित्रण स्टुडिओ / सेट वर झालेल असले तरी कृत्रिमता कुठेही जाणवत नाही. छायाचित्रण पण आवडले. एकंदरीत एक छान चित्रपट बघायची इच्छा असल्यास जरूर बघा.
जाताजाता... या चित्रपटाची अजून एक गंमत म्हणजे, बहुतेक लोकप्रिय चित्रपटांचे सिक्वेल्स / प्रिक्वेल्स निघतात. पण या चित्रपटाच्या बाबतीत तसे नाहीये. या चित्रपटाला आहे एक साथी चित्रपट. म्हणजे क्लिंट इस्टवुडनेच दिग्दर्शित केलेला 'फ्लॅग्ज ऑफ अवर फादर्स'. हा चित्रपटही इवो जिमाच्या लढाईवरच आहे पण त्यात अमेरिकेच्या दृष्टिकोनातून लढाई दाखवलेली आहे!!! दोन्हीही चित्रपट फक्त २ महिन्यांच्याच फरकाने प्रदर्शित झाले होते.

रविवार, १५ मार्च, २००९
जवळजवळ दर भारतभेटीत काही ना काही पुस्तकं विकत घ्यायचा प्रयत्न असतो. तिथे गेल्यावर वेळ थोडा असतो, त्यामुळे जायच्या आधीच काही पुस्तकांची यादी तयार करून सुसज्जच जावे लागते. तीन - चार महिन्यांपूर्वी असाच योग आला. काही पुस्तकांची नावं सुचव असं कळवल्यावर मुक्तसुनीतनी महेश एलकुंचवारांच्या 'पश्चिमप्रभा' या पुस्तकाचं नाव अग्रक्रमाने घेतलं. त्यामुळे पुस्तक घेतलेच.
हे पुस्तक, एलकुंचवारांनी 'लोकमत' मधे २००४-०५ साली साधारणपणे वर्षभर पाश्चिमात्य साहित्याची तोंडओळख मराठी सामान्य वाचकाला व्हावी अशा हेतूने चालवला होता. यामधे इंग्रजी बरोबरीनेच इतर युरोपिय भाषामधल्या काही उत्कृष्ट कलाकृतींचाही अतिशय धावती पण नेमकी अशी ओळख करून दिली आहे. वृत्तपत्रिय स्तंभलेखन या स्वरूपातले हे लेख अगदी छोटेखानी आहेत आणि ते त्या कलाकृतीची केवळ ओळख करून देणे एवढ्याच पुरते मर्यादित आहेत. पुस्तकाच्या मलपृष्ठावर एलकुंचवारांची भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे. ते म्हणतात,
".... गेली पन्नास वर्षे मी पाश्चात्य वाङ्मय वाचत आहे. त्याबद्दल बोलावे, त्याच्याबद्दल ऐकावे असा योग सहसा येत नाही. त्यामुळे.... मला विशेष आवडलेल्या पुस्तकांची... तोंडओळख वाचकांना करून द्यावी असे मला वाटले.
हे छोटे लेख टिपणवजा आहेत. ते समीक्षा नव्हेत. ते फार विवेचकही नाहीत.
.... ही सर्वच पुस्तके इतकी मोठी व अभिजात आहेत की एकेका छोट्याशा टिपणात त्यांना गवसणी घालणे शक्य नाही. पण ज्यांनी ती वाचलेली नाहीत त्यांना ती वाचावीशी वाटावीत व ज्यांनी ती वाचलेली आहेत त्यांना पुनःप्रत्यय मिळावा एवढाच मर्यादित हेतू हा स्तंभ लिहिताना मी मनाशी वागवला होता."
खरं म्हणजे लिहिणारे एलकुंचवार, विषय त्यांना आवडलेल्या साहित्यकृती आणि त्याही अभिजात वगैरे, तेव्हा इतक्या छोट्या टिपणवजा लेखांतून त्या त्या कलाकृतींचे समग्र दर्शन घडवणे ही एक तारेवरचीच कसरत होती. पण त्यांनी ती यशस्वीपणे निभावून नेली आहे. पुस्तकात जागोजागी प्रत्येक कलाकृतीतलं नेमकेपण टिपण्याचा त्यांचा गुण जाणवतो.
हेन्री मिलर, व्हॅन गॉफ, चेकोव, मॉम, टी. एस. एलियट, ग्रॅहॅम ग्रीन, पिरांदेलो, इब्सेन अशी बरेच वेळा कानावर पडलेली नावं तर त्यात आहेतच. पण रँबो, सोग्याल रिंपोचे, वॉल्ट व्हिटमन, लोर्का, ज्याँ जेने, सिल्विया प्लाथ अशी माझ्या सारख्याला कधीच माहित नसलेली नावं पण आहेतच. यातले काही लेखक तर रूढार्थाने साहित्यिकही नाहीत. उदाहरणार्थ तिबेटन लामा सोग्याल रिंपोचे हे धर्मगुरू. त्यांच्या 'तिबेटन बुक ऑफ लिव्हिंग अँड डायिंग' बद्दल खूप छान ओळख आहे. तसेच दाग हामरस्कोल्ड, हे गृहस्थ तर युनोचे सरचिटणीस. राजनयिक. पण त्यांचे 'मार्किंग्ज' हे काय जबरदस्त ताकदीचे असावे हे त्यांच्यावरचा लेख वाचताना जाणवते. पॉल ब्रंटनचे 'अ सर्च इन सिक्रेट इंडिया' हे एकमेव पुस्तक असे की जे मी आधी वाचले होते, आणि पुनःप्रत्ययाचा आनंद नक्कीच मिळाला.
पुस्तकात जागोजागी एलकुंचवाराच्या चौफेर वाचनाची कल्पना येते. रिंपोचेंच्या पुस्तकाच्या ओळखीत ते लिहितात, "गुरू रिंपोचे सांगतात ते भारतीय माणसाला नवीन नाही. योगसूत्रातला समाधीपाद आणि साधनपाद वाचलेल्या माणसाला तर नाहीच नाही." !!! तर बरेच ठिकाणी पाश्चात्य कलाकृतीशी समांतर अशी भारतीय किंवा मराठी साहित्यातली उदाहरणं ते देतात. ललित, कादंबरी, कविता, नाटक असे सगळेच साहित्यप्रकार हाताळले आहेत. शेवटी, "या माणसाने आयुष्यात फक्त वाचनच केले आहे का?" असे वाटायला लागते.
पण हे साधारण तीसेक लेखांचे पुस्तक वाचल्यावर माझी मात्र गोची झाली आहे. 'एकदा तरी वाचायची आहेत' या यादीत एकदम इतक्या पुस्तकांची भर पडली आहे. म्हणजे, एकंदरीत पुस्तकाचा मूळ उद्देश नक्कीच साध्य झाला आहे.
***
पश्चिमप्रभा
महेश एलकुंचवार
पहिली आवृत्ती (२००६)
चक्षू प्रकाशन, औरंगाबाद.
मूल्य : रू. १४०/-

शुक्रवार, १३ मार्च, २००९
माझं खोबार... भाग १ , ... भाग २ , ... भाग ३ , ... भाग ४ , ... भाग ५ , ... भाग ६ , ... भाग ७
*************
असं सगळं असलं तरी, सौदीतल्या कट्टरपणाबद्दल, विशेषतः अरब मुसलमानांच्या कट्टरपणाबद्दल नुसतं ऐकलंच होतं. एक ते 'देहांत शासन' प्रकरण सोडलं तर तसा धार्मिक कट्टरपणा आणि अतिरेकी वागण्याचा प्रत्यक्ष कधीच त्रास झाला नव्हता.
पण एकदा काय झालं....
*************
मित्रहो, मागच्या भागात मी मला भेटलेल्या काही पाकिस्तानी मित्रांबद्दल लिहिले. अभारतिय मुसलमान व्यक्तींशी इतक्या जवळून आलेला हा पहिलाच संबंध. पण तो तसा संमिश्र असाच अनुभव म्हणावा लागेल. किंबहुना काही तुरळक अपवाद वगळता, बव्हंशी चांगलेच अनुभव आले. पण व्यक्तिशः असे असले तरी, सामाजिक जीवनावर, हिंडण्या फिरण्यावर एक हलकी का होईना पण वेगळी छाप पडलीच होती. मी पुढे काही अनुभव देणार आहे, जे अगदी पूर्णपणे नाही तरी बर्याच प्रमाणात प्रातिनिधिक आहेत.
*************
सौदी अरेबिया मधली एक प्रसिद्ध ज्युसचा ब्रँड बनवणारी कंपनी आमची कस्टमर होती. माझे तिथे नेहमी जाणे येणे असे. तिथले सगळेच लोक मला चांगले ओळखायला लागले होते. माझा संबंध तिथे विशेषकरून तिथल्या अकाउंट्स / फायनान्स डिपार्टमेंट मधे येत होता. त्या डिपार्टमेंटला तीन माणसं आणि तिघेही इजिप्शियन (स्थानिक भाषेत 'मसरी', अरबीत इजिप्तला 'एल मिस्र' असे म्हणतात.), त्यामुळे एकंदरीत सगळाच घोळ होता. पूर्ण अरब जगात इजिप्शियन्स हे चक्रम आणि सणकी म्हणून ओळखले जातात. मला या तिघांनी हे अगदी व्यवस्थित पटवून द्यायचे असाच जणू काही चंग बांधलेला होता. ;) कोणतीही गोष्ट धडपणे होऊ देत नव्हते. पण हळू हळू त्यांच्याशी नीट ओळख वाढवून वातावरण जरा सुसह्य केले. एखादी गोष्ट कशी समजावली तर त्यांना समजेल याचा अंदाज आला. त्यांचा मुख्य होता अश्रफ आणि अजून एक होता नासर. (या नासरची भली मोठी दाढी होती. नेहमी मला धार्मिक गप्पा मारायला उद्युक्त करायचा. एकदम कट्टर होता. एक दिवस हा पठ्ठ्या दाढी सफाचट करून आला. कारण विचारलं तर म्हणे स्किन वर रॅश आली. नंतर कळलं की त्याला अमेरिकन व्हिसा साठी अर्ज करायचा होता. दाढी वगैरे असल्याने त्याला वाटले की एखाद वेळेस व्हिसा मिळणार नाही, म्हणून मग धर्म गेला उडत आणि दाढी झाली गायब. ;) ) तिसर्याचं नाव विसरलो. हळू हळू चांगली मैत्री झाली त्यांच्याशी. पण धार्मिक बाबतीत जरा कडवटपणा जाणवायचाच. कंपनीचा मुख्य अधिकारी इशफाक नावाचा एक पॅलेस्टिनियन होता. हा म्हणजे धर्मात जे जे करू नका असे सांगितलेले ते सगळे करणारा. दर विकेंडला स्वारी बाहरीनमधे मुक्काम ठोकून असायची. हा साहेब आणि ती मसरी गँग एकदम ३६चा आकडा. मी मध्यममार्गी धोरणाने कोणत्याही भानगडीत न पडता आपले काम कसे उरकेल त्या प्रमाणे रहायचो. इथेच माझा एक भारतिय मुस्लिम सहकारी पण येत असे.
एकदा आम्ही दोघंही तिथे एकदम पोचलो. काही काम चालू होतं. तेवढ्यात दुपारच्या प्रार्थनेची वेळ झाली. अश्रफ एकदम सगळे काम सोडून उभा राहिला. निघाला प्रार्थनेला. माझ्या सहकार्याला म्हणाला "चल. आपण प्रार्थना उरकून घेऊ आणि मग पुढचे काम करू." (इस्लामच्या शिकवणुकीप्रमाणे स्वतःच्या प्रार्थनेचं पुण्य, सव्वाब, मिळतंच पण दुसर्यांना प्रार्थनेला उद्युक्त केलं तर त्यांच्या पुण्यातला काही हिस्सा पण मिळतो. त्यामुळेच लोक एक दुसर्याला ओढत असतात प्रार्थनेची वेळ झाली की.) माझा सहकारी म्हणाला की "तू हो पुढे, मी एवढी चर्चा संपवून आलोच." अश्रफ हातपाय धुवायला गेला. (प्रार्थनेच्या आधी हातपाय धुणे आवश्यक असते. त्याला वदू (उर्दूत वझू) असे म्हणतात.) तो ते करून आला तरी माझा सहकारी माझ्या बरोबर चर्चा करतच होता. त्याला १-२ वेळा आठवण करून अश्रफ गेला. तेवढ्यात नासरने पण तसेच केले. मागे लागून लागून शेवटी तो पण गेला प्रार्थनेला. दोघेही प्रार्थना संपवून परत आले तरी आमची चर्चा चालूच. माझा सहकारी धार्मिक असला तरी एखादी चर्चा किंवा काम अर्धवट टाकून प्रार्थना करणे वगैरे त्याला चूक वाटायचे. जरा वेळाने हे दोघं परत आले आणि आमचे बोलणे चालूच आहे हे पाहून, अश्रफला वाटले की मीच त्याला प्रार्थनेला जाण्यापासून रोखतो आहे. माझ्या सहकार्याला तो मोठ्या दिमाखात म्हणाला, "हे बघ, हा देश आपला आहे. इथे तुला एखाद्या काफिराचे म्हणणे ऐकायची अजिबात गरज नाही. आधी प्रार्थना करून ये." हे ऐकून मी आणि माझा सहकारी काही क्षण अक्षरशः सुन्नच झालो. माझ्या बाबतीत असे पहिल्यांदाच घडले होते. पण मी त्यातून सावरायच्या आधीच माझा सहकारी एकदम उसळून त्याच्या अंगावर ओरडला, "गप्प बस. काहीही बरळू नकोस. प्रार्थना कधी करायची, करायची की नाही ही, मी आणि अल्ला, आमच्या मधली खाजगी बाब आहे. त्यात तुला दखल द्यायची काहीही गरज नाही. आणि माझ्या मित्राला असं काही बोलशील परत तर याद राख. वाट लावून ठेवेन तुझी. तू अतिशय उद्धटपणे बोलून त्याचा अपमान केला आहेस, आधी क्षमा माग."
हा सगळा प्रकार अक्षरशः काही सेकंदात घडला. मी भानावर यायच्या आत माझ्या मित्राने अक्षरशः त्याच्या नावाने शंख करायला सुरूवात केली. ४-५ लोक गोळा झाले. प्रकरण वाढलं आणि इशफाकसाहेब त्यांच्या केबिनमधून बाहेर आले. त्यांना अंदाज आला आणि तिथल्या तिथे त्यांनी स्वत: कंपनीच्या वतीने माझी माफी मागून प्रकरण मिटवले. आता अपमान करणारे मुसलमान, माझ्या बाजूने भांडणारा मुसलमानच आणि माझी माफी मागणारा पण मुसलमानच (तो सुद्धा अभारतिय) आणि मी 'काफिर'. किती फरक वागण्यात!!!
असाच अजून एक प्रसंग मला आठवतोय. माझ्या बाबतीत नाही घडलेला, पण एका चांगल्या स्नेह्यांच्या बाबतीत घडला होता. हे एक मराठी गृहस्थ, खोबारच्या (धाहरान) विमानतळावर एअर इंडियाचे एअरपोर्ट मॅनेजर म्हणून काम करत होते. खोबारला बदलून आले होते. त्यांचा एक सहायक होता, अजय म्हणून. पोरगा दिल्लीकडचा. एकदा एअर इंडियाचं विमान आलं होतं ते सुटायला काही तरी तांत्रिक कारणाने उशिर होत होता. माझे स्नेही तेव्हा नेमके दुसरीकडे होते. त्यांच्या खालोखाल म्हणून अजय सगळी धावपळ करत होता. त्या गडबडीत तो सुरक्षापरवाना गळ्यात घालायला विसरला. तसाच तो टर्मिनल बिल्डिंगच्या बाहेर पडला टारमॅकच्या दिशेने जायला. मोजून ४ पावलं गेला नसेल तर त्याला तिथल्या रक्षकाने अडवले. परवाना गळ्यात नाही म्हणून. हा म्हणाला परवाना आहेच, मी परत माझ्या केबिनमधे जाऊन परवाना घेऊन येतो. पण त्या रक्षकाने त्याला सरळ अटकच केली. हा हातापाया पडत राहिला की अरे अटक करायची तर खुशाल करा, हे एवढं फ्लाईट जाऊ दे. पण काही उपयोग झाला नाही. बाकीच्या स्टाफने हे माझ्या स्नेह्यांना कळवले. ते तातडीने आले आणि त्यांनी परिस्थिती सांभाळली. अजयला पण सोडवले. पण त्यांनी त्या रक्षकाविरूद्ध त्याने काही असभ्य भाषा वापरली म्हणून तक्रार केली. एअरपोर्टच्या मोठ्या साहेबाकडे प्रकरण गेले. सुनावणीच्या वेळी त्याने त्या रक्षकाला विचारले की काय काय घडले. त्याने सोयिस्कर कथन केले. मग अजयने त्याचे म्हणणे मांडले. पण शेवटी, "एका काफिराच्या सांगण्यावर विश्वास ठेवून एका मुसलमानाला शिक्षा करता येणार नाही" असा निवाडा होऊन त्या रक्षकाला 'बाइज्जत बरी' करण्यात आले. माझे स्नेही अक्षरशः संतापाने लाल झाले होते मला हा प्रसंग सांगताना पण.
पण असे प्रसंग आणि अनुभव घडणे नविन नसले तरी तितकेसे सर्रास पण नसे हेही नमूद केले पाहिजे.
सौदी अरेबियाची अजून एक खास पैदास म्हणजे 'मुतव्वा'. हे प्रकरण इस्लामी धर्मशास्त्राशी संबंधित असलं तरी आख्ख्या मुस्लिम जगात फक्त सौदी अरेबियातच बघायला मिळतं. आपण खोबार भाग २ मधे बघितलंच आहे की राजसत्ता (अब्द्'अल अझिझ) आणि धर्मसत्ता (शेख अब्द्-अल वहाब) अरबस्तानाच्या एकीकरणासाठी एकत्र आल्या होत्या. त्यातच सत्तेची वाटणी झाली होती. त्याचंच प्रत्यक्ष रूप म्हणजे मुतव्वा. या वाटणी प्रमाणे एक धर्ममार्तंडांची समिती स्थापन झाली. तिचे इंग्रजी नाव 'कमिटी फॉर द प्रपोगेशन ऑफ व्हर्च्यू अँड प्रिव्हेंशन ऑफ व्हाइस'. इतकं जबरदस्त नाव असलेल्या कमिटीचे धंदे पण एकदम जबरदस्तच. या समितीचे सदस्य हे काही विशिष्ट धार्मिक अभ्यासक्रम पूर्ण केलेले असतात. त्यांना व्यवस्थित पगार मिळतो. त्यांना पोलिसांसारखे काही अधिकार असतात. कुठेही इस्लाम विरूद्ध वर्तन होताना आढळलं तर त्या व्यक्तींवर तात्काळ आणि कडक कारवाई करायची त्यांना मुभा असते. कायद्या प्रमाणे त्यांच्या बरोबर एक पोलिस असणं बंधनकारक असलं तरी बहुतकरून तसं दिसत नाही. त्यांना कोणालाही अडवून कागदपत्र वगैरे तपासायचे अधिकार बहुधा नसावेत पण हाही नियम धाब्यावर बसवला जातो. याचं कारण म्हणजे त्यांच्या बद्दल असलेली आपल्यासारख्या सामान्य बाहेरच्यांना वाटणारी भिती. एखादा मुतव्वा समोर आला कीच अर्धं अवसान गळतं. इतकी त्यांची दहशत. त्यामुळे आजूबाजूला असे कोणी दिसले की लोक निमूटपणे रस्ता बदलून जातात.
हे मुतव्वा लोक साध्याच कपड्यात असतात. पण त्यांना ओळखणं अगदी सोप्पं असतं. त्यांचा गाऊन बर्यापैकी आखूड असतो. डोक्यावर रिंग नसते. आणि ती परिचित खूण.... भली मोठ्ठी दाढी... इंग्रजीत अनट्रिम्ड म्हणतात तशी. सहसा त्यांच्या हातात छडी असते. साधारण पणे २-२ च्या जोडीत फिरतात. नजर भिरभिरती. अजून एक खूण म्हणजे भली मोठ्ठी काळ्या काचा असलेली 'जीएमसी' गाडी. हातातली छडी खूप बोलते. विशेषतः प्रार्थनेची वेळ झाली, अजान झाली की सगळ्यांना प्रार्थनेला जाणे भाग पाडायला ही छडी एकदम पटाईत आहे. अश्या वेळी तुम्ही मुसलमान नसाल आणि तुम्हाला एखादा मुतव्वा प्रार्थेनला जायची सक्ती करतो तेव्हा तर प्रसंग फारच गंभीर होतो. आपण सांगावं की मी मुसलमान नाही आणि तो अतिशय आश्चर्याने तुमच्याकडे एखादा विचित्र प्राणी बघावा तसं बघून अगदी स्वाभाविकपणे विचारतो, "का?" !!! आता का काय? काय सांगणार, कप्पाळ? पण नाही, मग तिथेच भर रस्त्यात ऊन्हातान्हात इस्लाम वरचे एक अगम्य प्रवचन ऐकायला मिळते. आपण आपला भार एकदा या पायावर एकदा त्या पायावर टाकत निमूटपणे ऐकत राहणे एवढेच करू शकतो. म्हणली तर गंभीर म्हणली तर विनोदी अवस्था. मग त्याचे समाधान झाले की तो सोडून देतो. आणि एखादा मुसलमान सापडला तर पायावर छडीचे फटके हाणून जबरदस्तीने जवळच्या मशिदीत बोळवण होते त्याची.
मगाशी म्हणलं तसं त्यांच्या बद्दल वाटणारी जरबच आपल्याला गप्प बसवते. परत आपल्याला तिथली भाषा वगैरे काही कळत नाही त्यामुळे चेहरा जमेल तितका निरागस ठेवून निभावून न्यावं लागतं. मला स्वतःला कधी छडी खावी लागली नाही पण हा अनुभव घेतलेले बरेच होते माहितीतले. या मुतव्वांची अजून एक खासियत म्हणजे एखादी स्त्री काही चूक करताना आढळली तर ते तिच्याशी बहुतेक सरळ बोलणार नाहीत. तिच्या बरोबर जो कोणी पुरूष असेल त्याच्याशी बोलतात, म्हणजे त्यांची छडी बोलते आधी आणि मग ते बोलतात. :) आणि स्त्रिया एकट्या पडतच नाहीत बाहेर. कमीत कमी एखादा पुरूष असतोच बरोबर. नाहीतर घोळक्याने म्हणजे ७-८ जणी एकदम बाहेर पडायच्या.
एकदा मी बायकोमुळे छडी खाता खाता वाचलो. माझ्या बायकोला मुतव्वा बघायची फार उत्सुकता लागली होती. मी तिला म्हणायचो पण, काय तुझी महत्वाकांक्षा... पण नाही. आणि खोबार हे तेलव्यापाराचे केंद्र, खूप गोरे लोक तिथे असल्यामुळे सौदी अरेबियामधले सगळ्यात लिबरल शहर होते, त्यामुळे मुतव्वांची पकड बरीच ढिली होती. त्यामुळे मुतव्वा बघायचा योग वर्षातून ५-६ वेळाच. पण एकदा आलाच तो योग तिच्या नशिबात. आणि असा आला की परत तीने नाव नाही काढले.
झालं असं की एकदा तिला बरं नव्हतं, म्हणून आम्ही हॉस्पिटलमधे गेलो. मी गाडी पार्क केली आणि आम्ही हॉस्पिटलच्या मुख्य इमारतीकडे निघालो. तिथल्या रितीप्रमाणे तिने काळा गाऊन चढवलाच होता. डोक्यावर केस झाकले जातील असा स्कार्फही घेणं आवश्यक असतं. तेही केलं होतं. चालता चालता तो स्कार्फ खांद्यावर पडला. तेवढ्यात समोरून एक बिनारिंग, आखूड गाऊन घातलेली दाढी येताना बघितली मी. हळूच बायकोला म्हणलं, "तुला मुतव्वा बघायचा आहे ना? हळूच तिकडे बघ, तो जो आहे ना तो मुतव्वा." ती पण 'आजिं म्या परब्रह्म पाहिले'च्या आनंदात तल्लीन होऊन बघत होती. तेवढ्यात ते परब्रह्म आमच्याच दिशेने यायला लागलं. मला वाटले की आम्ही त्याच्याविषयी बोललो ते त्याला कळले वाटते. हलकासा घाम फुटला. तो अगदी माझ्या समोर येऊन उभा ठाकला.
पण काही बोलायच्या आधी सभ्यपणे हसला, मग म्हणाला, "शी युवर वाइफ?"
मी, "हो". (क.. क.. क.. क.. किरण स्टाईल मधे).
तो, "कॅन यू प्लीज आस्क हर टू कव्हर हरसेल्फ प्रॉपरली?"
हुश्श!!! माझ्या लक्षात आलं की काय बिघडलं होतं. लगेच सुधारणा झाली. मी त्याला हसून दाखवलं. तो पण हसला आणि गेला बिचारा आपल्या वाटेने. त्या दिवशी माझा डॉक्टरचा खर्च फुकटच गेला, औषध न घेताच बायको खडखडीत बरी झाली. ;)
तर असे हे मुतव्वे... खास सौदी प्रॉडक्ट. पण, परत तेच, मानवाला लागू पडणारं महान तत्व त्यांनाही लागू पडतं. म्हणजे... माणूस तो माणूसच... अरे ला कारे केलं की अर्धी अरेरावी संपते. हेच मुतव्व्यांच्या बाबतीत पण सत्य आहे. आपली चूक नसेल आणि अरबी मधे थोडा शाब्दिक लढा देता आला तर त्रास कमी होतो. माझ्या पाहण्यात आलेल्या उदाहरणावरून मला हे चांगलेच कळले. झालं काय की...
सौदी मधे सगळ्या रेस्टॉरंट्स मधे 'फॅमिली' आणि 'इतर' अशी द्विवर्ण्य व्यवस्था असते. 'फॅमिली' म्हणजे स्त्रिया किंवा स्त्रिया बरोबर असलेली कुटुंबं. आणि सडे / एकटे पुरूष असतील तर 'इतर' ... सौदी भाषेत बॅचलर्स. फॅमिली भागात अश्या बॅचलर्सना सक्त मनाई. माझे बॅचलर मित्र आमच्या बरोबर फिरायला वगैरे यायला एकदम तय्यार असायचे. कारण माझी बायको बरोबर असल्याने, त्यांना फॅमिली सेक्शन मधे बसायला मिळायचं. ;)
तर आमच्या एका कस्टमरकडचा एक सुदानी अकाऊंटंट एका मॉल मधल्या रेस्टॉरंट मधे गेला. सोबत त्याची बायको होतीच. हा गडी एकदम बिन्धास्त. सुदान म्हणजे पूर्णपणे अरबी झालेले आफ्रिकेतले राष्ट्र. मातृभाषा अरबीच त्याची. फॅमिली एरियात जागा नसल्याने हा बायकोबरोबर 'इतरां'साठी ठेवलेल्या भागात बसला. थोड्यावेळाने एक मुतव्वा येऊन त्याच्या अंगावर ओरडायला लागला. त्याला फॅमिली भागात जायची सक्ती करू लागला. हा खमक्या, तो उलट वाद घालू लागला. थोड्या वेळाने तो मुतव्वा कंटाळला. त्याने विचारलं, "अरे इथे सगळे पुरूष तुझ्या बायकोकडे बघतील ना , तुला चालेल?" आमचा मित्र बायकोकडे वळून म्हणाला "का गं? तुला चालेल?" ती पण अमेरिकेत वगैरे शिकलेली. तिला राग होताच असल्या प्रकाराचा. ती तडक म्हणाली, "मला काही फरक पडत नाही." हे ऐकून त्या मुतव्व्याला बहुतेक फेफरं आलं असेल. बाईला प्रॉब्लेम नाही, दादल्याला पण नाही, ती व्यवस्थित अंग झाकून होती, शांतपणे दोघं जेवत होते. त्यामुळे मुतव्व्याची पंचाईतच झाली. त्यांच्या नावाने शिव्याशाप घालत गेला बिचारा. आमचा मित्र ही गोष्ट सांगताना पण जाम हसत होता.
अजून एका परिस्थितीत या मुतव्व्यांचा एकदम शक्तीपात व्हायचा. ते म्हणजे पाश्चिमात्त्य. मुख्यत्वे अमेरिकन्स आणि इतर गोरी जमात. त्यांच्या समोर अगदीच शेपूट घालून असत. पण एक मात्र खरं की मी असतानाच हे मुतव्वे हळूहळू सौदी सरकारला डोईजड झाले होते. अफगाणिस्तानात गेलेले बहुसंख्य लोक याच पंथातले होते. त्यातले बरेच लोक सोविएत पाडावानंतर परत पण आले. पण मग त्यांना बर्याच गोष्टी अगदी मानवेनात. संघर्ष वाढले. पेरलं तसं उगवायला लागलं. असंतोष वाढू लागला आणि त्यातूनच एकदम मोठ्ठा स्फोट होऊन बाहेर पडला 'ओसामा बिन लादेन' नावाचा राक्षस. तो तर सौदी सरकारच्याच गळ्याला नख लावायला निघाला. त्यामुळे त्याला हद्दपार केलं आणि नंतर काय घडलं हा इतिहास जगासमोर आहेच. त्या वेळेपासून सरकार पण खूप सावध झालं. सगळ्यात मोठ्ठी धरपकड मुतव्व्यांचीच झाली. अशी बातमी होती की रियाध शहराबाहेर या मुतव्व्यांच्या 'पुनर्वसना'साठी खास 'केंद्रं' स्थापण्यात आली होती. नुकतंच असंही कळलं की सरकारने काही नविन कायदे लागू करून त्यांच्या कारावायांना अजून खूपच आळा घातला आहे. पण हा संघर्ष इतका सहजासहजी संपणारा नाही. या संघर्षाचा शेवट आपण अजून नक्कीच बघितलेला नाहीये. सर्वसामान्य सौदी माणसाला हिंसा नकोही असेल पण धर्माचा पगडा पण इतकाच आहे की धर्माच्या नावाने लढणारे तथाकथित 'धर्मयोद्धे' कुठे तरी जवळचे वाटतात. तेलावर असलेली राजघराण्यातल्या मूठभर लोकांची पकड आवडत नाही. गोर्या लोकांचे मुक्त वावरणे नकोसे वाटते. आणि करू तर काहीच शकत नाहीत. धुमसण्याशिवाय. लोकशाही नाहीच. सामाजिक उन्नतीच्या संधीही तश्या कमीच. पण नविन राजा बराच उदार आहे असे म्हणतात. बायकांना ड्रायव्हिंग करायला परवानगी मिळणे हे आता वास्तवाच्या कक्षेत, अगदी दूर क्षितिजावर का होईना, आले आहे. खोबार तर नक्कीच बदलतंय. माझ्या परवाच्या ट्रिपमधे मी एक दोन बायका बिना बुरख्याच्या पण बघितल्या. अगदी ५ वर्षांपूर्वी ही एक अगदी अशक्य अशी गोष्ट होती. विश्वास नाही बसत. कालाय तस्मै नमः हेच खरं.
पण असं सगळं असलं तरी तिथलं आमचं जीवन अगदीच रंगहीन किंवा कळाहीन असं मात्र अजिबात नव्हतं. बंधनं असली तरी आपण काहीतरी मार्ग काढतोच. आमचा बर्याच लोकांचा एक चांगला ग्रुप होता. आम्ही सणासुदीला एकत्र भेटायचो. धमाल करायचो. गाणी वगैरे व्हायची. एखाद्याचं घर मोठं असेल तर मस्त दांडिया वगैरे पण खेळायचो, नवरात्रीला. माझ्याच घरी चांगला १० दिवस दणकून गणपती पण बसवला होता. रोज गर्दी व्हायची आरतीला. आयुष्यात कधी देवासमोर हात जोडले नसतील असे लोक पण हौसेने येऊन उभे रहायचे आरतीला. बंधनात जगताना बंडखोरीचा आनंद मिळत असावा बहुतेक त्यांना. एरवी सुद्धा एकत्र भेटून धमाल चालयची. तासनतास गप्पा मारणे हा पण एक ठरलेला कार्यक्रम. विशेषतः विकेंडला. या गप्पातून वेगवेगळे मजेशीर किस्से ऐकायला मिळायचे. सौदी माणसांबद्दलचे / देशाबद्दलचे विनोद तर खूपच आहेत. त्यातले काही देतो इथे:
सौदी माणसं एका बाबतीत विलक्षण प्रसिद्ध. अतिशय जिगरबाज ड्रायव्हिंग. कुणाच्या बापाला भीत नाहीत. १२-१२ वर्षांची पोरं पण बिन्धास्त गाड्या उडवतात. त्यातून तिथले स्थानिक टॅक्सीवाले तर विचारूच नका... एकदम उडन खटोला. त्याचा हा किस्सा. एक गोरा एकदा रियाध विमानतळावर उतरतो आणि टॅक्सीत बसतो. टॅक्सी निघते. थोड्या वेळाने रेड सिग्नल येतो. टॅक्सीवाला शिस्तीत सिग्नल क्रॉस करून जातो. गोरा घामाघूम. अजून एक रेड सिग्नल. परत तेच. गोरा टाईट. तिसर्यांदा परत तेच. रेड सिग्नल, गाडी सुसाट. गोरा जवळ जवळ बेशुद्ध. तेवढ्यात अजून एक रेड सिग्नल येतो आणि टॅक्सीवाला क्रॉस करनार एवढ्यात सिग्नल ग्रीन होतो. टॅक्सीवाला जीवाच्या आकांताने ब्रेक मारून थांबतो. गोरा आधी टॅक्सीच्या बाहेर उडी मारतो. आणि मग त्या टॅक्सीवाल्याला विचारतो. "बाबारे, हा काय प्रकार आहे. सगळे रेड सिग्नल तोडलेस. इथे मात्र ग्रीन असून सुद्धा कचकचून ब्रेक मारलास. का?" टॅक्सीवाला म्हणतो... "मग, उजवीकडून एखादा टॅक्सीवाला येत असेल तर." !!!!!
अजून एक विनोद म्हणजे सौदी मधली व्हिसा सिस्टिम. तिथे व्हिसावर हा माणूस काय कामासाठी आला आहे हे लिहिलेले असते. त्याला प्रोफेशन म्हणतात. प्रत्येक कंपनीला व्हिसाचा कोटा प्रोफेशन प्रमाणे आणि राष्ट्रियत्वाप्रमाणे ठरवून दिलेले असतो. सगळी नोकरभरती त्यात बसवावी लागते. त्यामुळे असे होते की घ्यायचा आहे भारतिय मॅनेजर पण कंपनीकडे भारतिय मॅनेजरचा व्हिसा नाहीये मग दुसरा जो काही भरतिय व्हिसा उपलब्ध असेल तो घ्यायचा माणसाला आणायचं. त्या मुळे बरेच वेळा व्हिसा प्रोफेशन एक आणि माणूस काम भलतंच करतोय असं दिसायचं. माझ्या ओळखीचा एक जण एका कंपनीत जी.एम. होता पण व्हिसा होता कूकचा. त्यामुळे त्याला बायकोला तिकडे नेताना त्रास झाला. कारण तो जरी जी.एम असला तरी सरकारदरबारी तो 'लेबर कॅटेगरी' असल्याने बायकोला आनता येत नव्हते. तर असाच किस्सा....
एकदा रियाध झू मधे एक नविन वाघ आणला. पहिल्या दिवशी त्याला जेवायला केळी दिली गेली. वाघ बेक्कार वैतागला. पण बिचारा प्रवासातून दमून भागून आला होता म्हणून जे मिळालं ते खाल्लं. दुसर्या दिवशी परत तेच. समोर हाऽऽऽ केळ्यांचा ढीग. वैतागला बिचारा. पण असेल काही स्थानिक पद्धत म्हणून गप्प बसला. तिसर्या दिवशी मात्र असं झालं आणि हा चवताळला. मोठमोठ्याने डरकाळ्या फोडायला लागला. तिथला कीपर धावत आला. "काय रे, काय झालं तुला ओरडायला?" वाघ म्हणाला, "अरे मी वाघ आहे वाघ. मला केळी कसली देतोस?" कीपर शांत पणे म्हणाला, "तू असशील वाघ... पण तुझा व्हिसा माकडाचा आहे. तुला केळीच मिळतील." !!!!!
आणि हा मला सगळ्यात जास्त आवडलेला.... एक जण दुसर्याला म्हणतो... "सौदी अरेबिया इज द सेकंड बेस्ट प्लेस इन द वर्ल्ड." दुसरा हैराण. "व्हिच इज द बेस्ट प्लेस देन?" पहिला म्हणतो... "रेस्ट ऑफ द वर्ल्ड" !!!!!
*************
मंडळी, खोबारने मला खूप काही दिलं. आयुष्यात पहिल्यांदा दूर भिरकावून दिल्यासारखा झालो होतो, मला आधार दिला. आसरा दिला. आप्तस्वकियांच्या आधाराशिवाय जगायला शिकवलं. माझी बायको आणि मुलगी तिथे आले तेव्हा कुटंबाची जबाबदारी पूर्णपणे आपल्यावर असणे म्हणजे काय हे दाखवून दिलं. निरनिराळे लोक भेटले, नाना देशीचे नाना तर्हा असलेले नमूने बघितले, आपल्या स्वभावाला शक्य आणि आवश्यक तेवढी मुरड घालून त्यांच्याशी कसं जमवून घ्यायचं ते कळलं. एक नविन संस्कृती / भाषा जिच्याबद्दल लहानपाणापासून सुरस आणि चमत्कारिक कथा ऐकून एक वेगळीच प्रतिमा मनात निर्माण झालेली असते, तिच्याबद्दल खूप काही शिकायला मिळालं. आणि सगळ्यात महत्वाचं.... माणूस नावाचा अनाकलनिय आणि अतुलनिय प्रकार हा एका विशिष्ट पातळीवर सगळीकडे सारखाच असतो हे थोडंफार समजलं.
तर मंडळी असं हे माझं खोबार. वेगवेगळ्या रंगांचं. मला जे दिसले त्यातले जमले तेवढे रंग तुमच्या पुढे ठेवायचा प्रयत्न केला. जमलं की नाही हे तुम्हीच ठरवा. मी मात्र माझ्यासाठीच लिहित होतो. माझ्या मनात घर करून बसलेल्या खोबारचं ऋण उतरायचं होतं. कोणाबरोबर तरी वाटायचं होतं. ते झालं. खरं तर खोबार हे एक रूपक आहे, प्रत्येकाच्याच आयुष्यात असं एक खोबार येतं. कोणाला ते आपल्या राहत्या घरीच सापडतं... कोणाला कॉलेजच्या हॉस्टेलवर, तर कोणाला घरापासून हजारो मैल दूर परक्या देशात परक्या मातीत. पण आपापलं खोबार सापडणं हे महत्वाचं. मला ते 'अल खोबार' नावाच्या गावात सापडलं. तुम्हाला?
ऐकायला आवडेल मला...
सफळ संपूर्ण.